आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्रामच्या दुर्दशेवरून संताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केवळ दहा मिनिटांच्या पावसात साधुग्रामची दुर्दशा झाल्याचे पाहून संतप्त झालेल्या ग्यानदास महाराजांनी जिल्हाधिकारी, महापौर महापालिका आयुक्तांवर शरसंधान केले. कमिशन घेऊन निकृष्ट कामे झाल्याचा आरोप करीत दहा मिनिटांच्या पावसात असे होत असेल, तर ऐन कुंभमेळ्यात जोरदार पाऊस झाला तर माेठी दुर्घटना घडू शकेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
रविवारी (दि. ७) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात साधुग्राममध्ये बांधलेल्या तात्पुरत्या स्वच्छतागृहांची दैना उडाली. काही ठिकाणी पत्रे उडाले, तर काही ठिकाणी छोट्या राहुट्याही कोसळल्या. या पावसामुळे साधुग्राममधील कामे निकृष्ट असल्याबाबत होणाऱ्या आरोपांनाही जणू पुष्टी मिळत होती. सोमवारी ग्यानदास महाराजांनी साधुग्रामच्या दुरवस्थेवरून महापौर अशोक मुर्तडक यांना विचारणा केली. मुर्तडक यांनी त्वरित दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ग्यानदास महाराज म्हणाले की, चांगल्या ठेकेदारांकडे काम दिल्याचा हा परिणाम आहे. यामागे टक्केवारीचे अर्थकारण असून, यात सर्व गुंतले आहेत. दहा मिनिटांच्या पावसात अशी अवस्था झाली असून, ऐन कुंभमेळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर त्यात साधू-महंत अडकून प्राणहानी होण्याचा धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. २००३ मध्ये कुंभमेळ्याच्या वेळी झालेल्या पावसात साधुग्रामचे मोठे नुकसान झाल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला.
साधुग्रामचे काम कधी पूर्ण होणार, असा सवालही ग्यानदास महाराजांनी केला. त्यावर ठेकेदाराकडून १५ जूनपर्यंत मुदत असल्याचे सांगितले. मात्र, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सावध पवित्रा घेत सर्व कामे पूर्ण होण्यासाठी साधारण ३० जून उजाडेल, असेही सांगितले.
वस्त्रांतरगृह पाडण्याची मागणी
साधुग्रामच्या पाहणी दौऱ्यानंतर मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाधिकारी आयुक्तांशी बोलताना ग्यानदास महाराजांनी वस्त्रांतरगृह पाडण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तसा निर्णय झाला होता. मात्र, त्यास पुराेहित संघाने विरोध केल्यामुळे प्रशासनाने पाऊल मागे घेतले होते.
३० जूनपर्यंत साधुग्राम होणार पूर्ण
महापौर, आयुक्त, ग्यानदास महाराज, जिल्हाधिकारी आदींनी साधुग्राममध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, भेटीआधी झाले संतप्त...अधिकाऱ्यांनी केले शांत...
बातम्या आणखी आहेत...