आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue About Bayometric Machin In Nashik Municipal Corporation

अायुक्त-सफाई कर्मचाऱ्यांमध्ये बायाेमॅट्रिक हजेरीवरून हमरीतुमरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बायाेमॅट्रिक हजेरीचा निर्णय शिथिल करण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्यात साेमवारी सायंकाळी जाेरदार हमरीतुमरी झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. अायुक्तांनी निवेदन फेकून पाेलिसांना बाेलावण्याची धमकी िदल्याचा दावा करीत सुरेश मारू सुरेश दलाेड या पदाधिकाऱ्यांनी पाेलिसांचा दबाव वापरून अायुक्त प्रत्येक संघटनेला दडपत असल्याचा अाराेप केला, तर अायुक्तांनी बायाेमॅट्रिक हजेरी हा िनव्वळ प्रशासकीय शिस्त कामचाेरीला लगाम लावण्याचा भाग असल्यामुळे त्यात काेणी अडथळा अाणू नये, अशी विनंती केल्याचे स्पष्ट केले.
अायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डाॅ. गेडाम यांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांविराेधात माेहीम उघडली. अचानक भेटीत अनेक कर्मचारी गैरहजर अाढळले. मात्र, शिस्त अाणण्यासाठी ठाेस यंत्रणा उभारण्याचा मानस अायुक्तांनी व्यक्त केला हाेता. सिंहस्थ, स्मार्ट सिटीच्या व्यस्त कार्यक्रमानंतर अायुक्तांनी बायाेमॅट्रिकचा विषय हाती घेतल्यानंतर त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अायुक्तांची मारू, दलाेड यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी अायुक्तांनी िनवेदन बघून नियमाचा विषय असल्यामुळे ही मागणी मान्य हाेणार नाही, असे धुडकावल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर पदाधिकाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक विषय प्रलंबित असून, नियमानुसार असलेले ते विषय हाती घेतले जात नाहीत मग बायाेमॅट्रिकच का, असा सवाल केल्याचा दावा केला. त्यावर अायुक्तांनी निवेदनच फेकून दबाव अाणणार असाल तर पाेलिसांना फाेन करू, असे सांगितले. त्यावर पदाधिकाऱ्यांनी अटकेची तयारी दाखवल्यावर वाद चिघळला. अखेर अायुक्तांनी पाेलिसांना फाेन केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर येत ऊन अांदाेलनाची तयारी केली.

सीसीटीव्हीफुटेज निर्णायक :
अायुक्तदालनातील सीसीटीव्ही फुटेज अाता महत्त्वाचे ठरणार अाहे. अायुक्तांनी फुटेज ताब्यात घेण्याचे संकेत दिले, तर कर्मचारी संघटनांनी पाेलिसांना खुले अाव्हान देत फुटेज तपासून जर अामची चूक असेल तर खुशाल गुन्हे दाखल करा, मात्र अायुक्त चुकीचे असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, असे सांगितले.
काँग्रेसची शिष्टाई, अांदाेलनाचा इशारा
दरम्यान,सफाई कर्मचारी संघटनांनी बायाेमॅट्रिक अायुक्तांच्या वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी जाेरदार अांदाेलन उभारण्याचा इशारा पत्रकारांशी बाेलताना दिला. वाद पेटल्याचे बघून काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अाहेर, नगरसेवक उद्धव निमसे, प्रा. कुणाल वाघ, माजी नगरसेविका हेमलता पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अायुक्त कर्मचाऱ्यांमध्ये समेटासाठी प्रयत्न केले.

मारू-दलाेड
बायाेमॅट्रिकहजेरीला विराेध नाही. मात्र, प्रथम हजार सफाई कर्मचाऱ्यांची पदे भरावीत. सध्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत असून, ठराविक अंतराने त्यांना बायाेमॅट्रिक हजेरी शक्य हाेणार नाही. नियमाची इतकीच काटेकाेर अंमलबजावणी करायची असेल तर प्रथम अनुकंपा तत्त्वावर रखडलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्या, पागे कमिटीच्या शिफारशी लागू कराव्या. सातपूरमध्ये गटारीत पडून मृत झालेल्या कामगाराला नियमानुसार १० लाखांची मदत द्यावी. मात्र, अायुक्तांना त्यात स्वारस्य नसून, पाेलिसांचा वापर करून संघटनांना दडपण्याचा प्रयत्न अाहे.
प्रायाेगिक तत्त्वावर बायाेमॅट्रिकची याेजना असून, अनेक कर्मचारी कामचुकारपणा करतात, तर काहींना अतिरिक्त काम करूनही त्यांना माेबदला मिळत नाही. त्यासाठी बायाेमॅट्रिक यंत्रणा बसवण्यात येत अाहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या असून, लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जात अाहे. त्यांचे वैद्यकीय देयके तत्काळ मंजूर हाेतात, वाढीव कर्मचारी भरतीचा प्रस्ताव दिला अाहे. श्रमसाफल्य याेजनेंतर्गत २५ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावावर सरकारी निवासस्थान करण्याचे प्रयत्न सुरू अाहेत.- -डाॅ. प्रवीण गेडाम