आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कत्तलखाने बंदबाबत मनपाने फिरवला निर्णय, १७ सप्टेंबरलाच बंदीची केली सक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मांस विक्रेत्यांवर कारवाई करताना महापालिकेचे पथक. - Divya Marathi
मांस विक्रेत्यांवर कारवाई करताना महापालिकेचे पथक.
अमरावती- नऊ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबरपर्यंत सलग नऊ दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय बदलवत आता फक्त आणि १७ सप्टेंबरलाच कत्तलखाने बंद ठेवावे उर्वरित दिवसांत बंद ठेवण्यास सहकार्य करावे, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान बंदी असतानाही आज, सप्टेंबरला मांसवक्री सुरु ठेवल्याबद्दल पालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करीत सुमारे दोन ट्रक साहित्य जप्त केले. कारवाईदरम्यान १५ किलोग्रॅम मांस मासोळ्याही जप्त केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जैन धर्मियांचे पर्युषण पर्व असल्यामुळे ते १७ सप्टेंबरदरम्यान मांसवक्री बंद ठेवावी, अशी सूचना मनपाने दिली होती. त्यामुळे गेले दोन दिवस चांगलेच घमासान झाले. अनेकांनी उर्वरितपान
तीन भागांमध्ये कारवाई
दरम्यानआज, सप्टेंबर रोजी मांस विक्री बंदचा आदेश जारी केला असतानाही त्याविरुद्ध कृती करणाऱ्यांचे साहित्य मनपाने जप्त केले आहे. मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार चपराशीपुरा, दस्तुरनगर, यशोदानगर, अप्पर वर्धा वसाहत, बेलपुरा, चांदणी चौक, इतवाराबाजार या भागातून सत्तूर, पिंजरे, लाकडी खोके असे दोन ट्रक साहित्य सुमारे १५ किलो मटन जप्त करण्यात आले.