आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोकेदायक चेंबर्सची सफाई अद्यापही सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनाशिक- तपुरयेथे दोन सफाई कर्मचाऱ्यांचा चेंबरमध्ये गुदमरून झालेला मृत्यू सर्वोच्च न्यायालयाने चेंबर्सची मनुष्यबळ वापरून सफाई करण्यावर घातलेले निर्बंध आदी बाबींवर बुधवारी झालेल्या महासभेत जोरदार ऊहापोह झाला. पण, अद्यापही शहरात सर्रासपणे चेंबर्सची सफाई कर्मचाऱ्यांमार्फत सुरू असल्याचे बघून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी थेट आयुक्तांनाच जाब विचारला जाणार आहे.

गेल्यावर्षी सोमेश्वर येथे चेंबरमध्ये उतरल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला होता. गेल्या शनिवारी सातपूर येथे दोघांना जीव गमवावा लागला. या प्रकरणानंतर झालेल्या महासभेत शिवसेनेसह सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले होते. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बरस्ते सुधाकर बडगुजर यांनी चेंबरमध्ये कर्मचाऱ्याला उतरवू नये वा मनुष्यबळाचा वापर करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दाखवले होते. असे केले तर प्रशासन प्रमुखावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याचाही त्यांचा दावा होता. सातपूर प्रकरणात कोणी तक्रार केली नाही तर शिवसेना प्रशासनावर कारवाईसाठी पुढाकार घेईल, असा इशारा दिला होता. महासभेला दोन दिवस उलटले नाही ताेच चेंबर्सची कर्मचाऱ्यांमार्फत सफाई सुरू असल्याचा प्रकार द्वारका येथील राधिका हॉटेलनजीक सुरू असल्याची बाब बोरस्ते बडगुजर यांना समजली. त्यांनी घटनास्थळी जात संबधित कर्मचाऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली आवश्यक साहित्य नसताना सफाई करू नका, असे आवाहनही केले. दरम्यान, याप्रकरणी आता प्रशासनाला जाब विचारला जाईल, असे बोरस्ते यांनी स्पष्ट केले.