आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाराेग्य विभागाकडेच ११३७ कंत्राटी कर्मचारी, दर महिन्याकाठी तीन काेटींपर्यंत कंत्राटावर खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अास्थापना खर्चाच्या नावाखाली महापालिकेतील नाेकरभरतीला ठेंगा दाखवणाऱ्या प्रशासनाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांवर हाेणाऱ्या खर्चाची माहिती अाता महासभेच्या अादेशानुसार गाेळा करण्यास सुरुवात झाली असून, एकट्या अाराेग्य विभागात सुमारे ११३७ कंत्राटी कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती पुढे अाली अाहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या वेतनासह कंत्राटावर मासिक दाेन काेटींपर्यंत खर्च हाेत असल्याचेही समाेर अाले अाहे.

अार्थिक खडखडाट अास्थापना खर्च ३५ टक्क्यांवर असल्याने पालिकेत थेट नाेकरभरतीचे दरवाजे बंद झाले अाहेत. दुसरीकडे, सेवानिवृत्ती विविध कारणांमुळे रिक्त हाेणाऱ्या पदांची संख्या वाढते अाहे. मध्यंतरी राज्य शासनाने पालिकेला थेट नाेकरभरतीऐवजी अाउटसाेर्सिंगद्वारे भरतीचे निर्देश दिले. परिणामी, पालिकेत किरकाेळ कामापासून तर माेठ्या कामापर्यंत खासगीकरणातून कर्मचारी घेतले जात अाहे. मध्यंतरी महासभेत जवळपास दाेन हजार सफाई कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत गरज असल्याचे उघड झाले. प्रशासनाने त्यापैकी साडेसातशे कर्मचारी खासगीकरणातून भरण्याचा प्रस्ताव ठेवला, मात्र सुधारित वेतन कायद्यानुसार खासगीकरणाइतकाच खर्च पालिका सेवेत मानधनावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर हाेणार असल्यामुळे ठेकेदाराला कशाला पाेसायचे, असा युक्तिवाद करून विराेध झाला. उपमहापाैर बग्गा यांनी ठेकेदारीकरणावर हाेणारा खर्च, ठेकेदाराच्या अास्थापनावरील कर्मचारी त्यांचे वेतन हीच पदे पालिकेने भरल्यानंतर वेतन अन्य बाबींवर हाेणाऱ्या खर्चाची माहिती संकलित करावी, अशी सूचना मांडली हाेती. त्यानुसार महापाैर अशाेक मुर्तडक यांनी प्रशासनाला अादेशही दिले हाेते. त्याप्रमाणे पालिकेने सर्व खातेप्रमुखांना अादेश देऊन माहिती मागवली अाहे.

श्वान निर्बीजीकरणाच्या ठेक्यासाठी १४ कर्मचारी कार्यरत अाहेत. तर, पेस्ट कंट्राेलसाठी २३८ कर्मचाऱ्यांवर ५५ लाखांचा खर्च होतो अाहे. अाराेग्य विभागात हजाराहून अधिक कंत्राटी कर्मचारी असून, याव्यतिरिक्त वैद्यकीय, पाणीपुरवठा, यांत्रिकी, खत प्रकल्प येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांची फाैजच तैनात अाहे.

कोटी ४७ लाखांवर खर्च
एकट्याअाराेग्य विभागात सातशे कर्मचारी कार्यरत असल्याचे समाेर अाले अाहे. त्यात ४३५ कर्मचारी केरकचरा संकलन करून वाहतूक करण्यावर मासिक काेटी ४७ लाख ५१ हजारांचा खर्च येत अाहे. घंटागाडीमार्फत केरकचरा संकलन वाहतुकीसाठी ४५० कर्मचारी असून, त्यांच्यावरही जवळपास दीड काेटीचा खर्च येत अाहे.
बातम्या आणखी आहेत...