आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी दहा पथके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गाेदावरीला मंगळवारी अालेल्या महापुरानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेसाेबत घेत दहा पथके तयार केली अाहेत. यात पालिकेचे अभियंता स्तरावरील अधिकारी पथकात समाविष्ट केले जाणार असून, तूर्तास २० माेठ्या नुकसानीचे ठिकाणे निश्चित करण्यात अाल्याची माहिती अतिरिक्त अायुक्त अनिल चव्हाण यांनी दिली.

गाेदावरीच्या किनाऱ्यावर सर्वाधिक नुकसान गंगापूरराेड, पंचवटी, तपाेवन, दसक-पंचक भागात झाले अाहे. यात अनेकांच्या घरांत गाेदावरीचे पाणी जाऊन माेठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. यात महापालिकेकडून अाता गाळ मलबा काढण्याची माेहीम सुरू झाली अाहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने अाता काेठे शहरातील पंचनाम्याकडे लक्ष केंद्रित केले असून, तूर्तास दहा पथके तयार केली जाणार अाहेत. यात एका पथकात दाेन तलाठी, तर दाेन पालिकेचे अभियंता असतील. दरम्यान, उपमहापाैर बग्गा यांनी पंचनामे करताना संबंधित नगरसेवकांशीही चर्चा करावी, अशी मागणी अतिरिक्त अायुक्तांकडे केली. जेणेकरून काेणता भाग सुटणार नाही पुराच्या नावाखाली चुकीच्या व्यक्तींना लाभ मिळण्याचे प्रकारही हाेणार नाही.

शनिवारपासूनखासगी हाॅस्पिटलच्या मदतीने उपचार :उपमहापाैर गुरुमित बग्गा, नगरसेविका विमल पाटील, नरेश पाटील यांच्या प्रयत्नातून अाता गाेदावरीच्या पुराचा फटका बसलेल्या सर्वच भागात माेफत अाैषधाेपचार माेहीम राबवली जाणार अाहे. या माेहिमेत महापालिकेला मदतीला खासगी हाॅस्पिटल्सही धावून अाली अाहेत. पुरामुळे झालेल्या कचरा घाणीच्या पार्श्वभूमीवर साथराेग पसरण्याची भीती अाहे. या पार्श्वभूमीवर फिरते दवाखाने तयार करून प्रत्येक घरात जाऊन तपासणी केली जाणार अाहे. यात काही प्रमाणात खासगी हाॅस्पिटलकडून अाैषधेही पुरवली जाणार अाहेत. शनिवारपासून या माेहिमेला सुरुवात हाेणार असल्याचे बग्गा यांनी सांगितले. गुरुवारी पंचवटीतील एरंडवाडी, चिंचबन परिसरातील रुग्णांची तपासणी करून एक हजार लाेकांना अाैषधे दिली गेल्याचेही सांगितले. पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कचरा मलबा उचलण्यासाठी दुपारीही घंटागाड्यांच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी बग्गा यांनी अायुक्तांकडे केली. त्यास अायुक्तांनी मान्य करीत, पुढील तीन दिवस घंटागाड्या दुपारीही पाठवून मलबा कचरा उचलला जाईल, असेही स्पष्ट केले.

डासप्रतिबंधक फवारणीही हाेणार : दरम्यान,मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुरानंतर शहरातील अाराेग्याच्यादृष्टीने दिलेल्या अादेशानुसार महापालिकेने पूरग्रस्त तसेच संपूर्ण शहरात डास प्रतिबंधासाठी अाैषध फवारणीचा निर्णय घेतला अाहे. त्याचाच एक भाग म्हणून अाराेग्य विभागाने वेळापत्रकही तयार केले अाहे.

पंचवटी-एरंडवाडी,सुदर्शन काॅलनी, श्रमजीवी झाेपडपट्टी, नाशिकपश्चिम विभाग- मंगलवाडी,जाेशीवाडी, मल्हारखाण, संभाजी चाैक, सिटी सेंटर माॅल, नाशिकपूर्व- शीतलदेवीपरिसर, भारतनगर, अांबेडकरवाडी, म्हसाेबावाडी. सातपूर-स्वारबाबानगर,कांबळेवाडी, नासर्डी नदीलगत. सिडकाे- गणेश चाैक, शिवाजी चाैक, पेलिकन पार्क परिसर. नाशिकराेड-राेकडाेबावाडी,सुंदरनगर, देवळालीगाव, मनपा वसाहत परिसर या भागात अाैषध फवारणी केली जाणार अाहे.

पंचनामे करण्यास टाळाटाळ
पूरग्रस्त भागातील नुकसानीची त्वरित पाहणी करून महसूल यंत्रणेने पंचनामे करण्याची गरज अाहे. पंचनाम्यांअभावी लाेकांना मदत मिळत नसून, तत्काळ मनपा जिल्हाधिकारी कार्यालयाने पंचनामे करावेत. संजयचव्हाण, सभापती, शिक्षण समिती, मनपा.
बातम्या आणखी आहेत...