आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडवलेल्या पाण्यामुळे घाटावर पसरली दुर्गंधी, दसकच्या दशरथ घाटाच्या नामकरणास विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- सिंहस्थातीलशाही पर्वणीच्या दिवशी भाविकांची स्नानाची व्यवस्था असलेल्या दसकच्या घाटावर अडवलेल्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. पाण्याची पातळी समाधानकारक असण्यासाठी पंचकजवळ बंधारा टाकून पाणी अडवण्यात आले आहे. मात्र, आगर टाकळीच्या मलशुद्धीकरण केंद्रातील पाण्यामुळे पात्रातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. पात्रातील खडक फोडण्याचे कामही अपूर्ण आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरून रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी दसक-पंचकला औरंगाबादकडून येणाऱ्या भाविकांसाठी नांदूर-मानूर येथील घाट आरक्षित आहे. दरम्यान, नदीपात्रातील खडक फोडून समांतराचे काम थोडा खडक फाेडल्यानंतर बंद झाले. ठेकेदाराचे पैसे पूर्ण झाल्याने त्याने काम बंद केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याची तक्रार नगरसेवक अशोक सातभाईंनी केली आहे.

ऐनसिंहस्थ कुंभमेळ्यात दसक येथील गोदावरी नदीवरील घाटाच्या नामकरणाने वाद निर्माण झाला आहे. महापालिकेने तीन वर्षांपूर्वी नामकरण केलेल्या ‘राजा दशरथ घाटा’चे प्रशासनाने ‘रामघाट’ नामकरण करून तसे फलकही लावल्याने स्थानिक नगरसेवक अशोक सातभाई यांनी त्यास विरोध केला आहे. दोन दिवसांत ‘रामघाट’चे फलक काढावेत, अन्यथा स्वखर्चाने फलक हटवण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

दसक गोदावरी नदीतीरावर श्रीरामांनी राजा दशरथ यांचा दशक्रिया विधी केल्याची अाख्यायिका असून, तशा तेथे खुणा असल्याने सन २०१२ मध्ये नगरसेवक अशोक सातभाई यांनी नाव नसलेल्या या घाटाला ‘राजा दशरथ घाट’ असा ठराव मंजूर केला. पालिकेने घाटावर फलकदेखील लावले. तसेच, रामकुंड येथील छत्रीच्या धर्तीवर छत्रीचे बांधकाम सुरू केले, परंतु सिंहस्थातील घाटाच्या कामामुळे छत्रीचे काम अर्धवट अवस्थेत प्रशासनाने बंद केले.

साधुग्राममधील आखाडा ध्वजारोहणास काही तासांचाच कालावधी राहिलेला असताना प्रशासनाने ‘राजा दशरथ घाटा’चे नाव बदलून ‘रामघाट’ असे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. शिखर परिषदेच्या सूचनेनुसार फलक लावल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘राजा दशरथ घाट’ या नावामुळे भाविक येथे स्नान करणार नसल्याने ‘रामघाट’ नामकरण केल्याचे सांगितले.

तीनवर्षांपूर्वी नामकरण : महापालिकेनेदि. १८ ऑक्टोबर २०१२ रोजी क्रमांक २८१ ठरावानुसार तत्कालीन महापौर यतिन वाघ यांच्या कार्यकाळात दसक येथील गोदावरी नदीच्या घाटाला ‘राजा दशरथ घाट’ असे नामकरण केले आहे. ठरावास सर्वानुमते मंजुरी दिल्यानंतर घाटावर तसे फलक लावण्यात आले आहेत.
रामकुंडाप्रमाणे पवित्र
श्रीरामांनीराजा दशरथ यांचा दशक्रिया विधी दसकला केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे ते रामकुंडाप्रमाणे पवित्र आहे. वामनरावबाेराडे, विश्वस्त, श्री मारुती मंदिर

फलक त्वरित काढावेत
दोन दिवसांत ‘रामघाट’चे फलक काढावेत, अन्यथा स्वखर्चाने ‘राजा दशरथ घाट’चे फलक लावण्यात येतील. -अशोक सातभाई, स्थानिक नगरसेवक

दसक येथील गोदावरीच्या घाटाचे ‘राजा दशरथ घाट’ असे नामकरण केल्याचा महापालिकेने ऑक्टोबर २०१२ मध्ये लावलेला फलक. दुसऱ्या छायाचित्रात या घाटाचे पुन्हा नामकरण करून नुकताच लावलेला ‘रामघाट’चा फलक.