आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अबब...! डेंग्यूचे २० दिवसांत ९६ रुग्ण, पेस्ट कंट्राेल ठेक्यानंतरही डेंग्यूचा डंख कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील अाराेग्याचा प्रश्न जणू ठेकेदारीकरणापेक्षा कमी महत्त्वाचा अाहे की काय, असा समज महापालिकेच्या अाराेग्य विभागाचा झाल्याचेच चित्र असून, पेस्ट कंट्राेलचा नवीन ठेका दिल्यानंतर डेंग्यूवर नियंत्रण मिळण्याचे साेडून अालेख वाढतच चालला अाहे. डेंग्यूचे वीस दिवसांत तब्बल ९६ रुग्ण अाढळले असून, एक दिवसात सरासरी तीन रुग्ण अशी भयानक परिस्थिती अाहे.

महापालिकेच्या अाराेग्य विभागाचे कामकाज अत्यंत वादात असून, ठेकेदारांचे चांगभले करण्याच्या नादात शहरातील अाराेग्याच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष हाेताना दिसत अाहे. सद्यस्थितीत पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले असून, त्यात डासांची चांगलीच पैदास हाेत अाहे. मात्र, अशा ठिकाणी कामचलाऊ धुरळणी फवारणीहाेताना दिसत असून, त्याचा परिणाम म्हणजे शहरात साथराेगाचे प्रमाण वाढतच चालले अाहे. म्हणूनच की काय डेंग्यूचे तब्बल १९० संशयित अाढळले असून, त्यापैकी ९६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले अाहे. जानेवारी ते अाॅगस्ट या कालावधीत हजाराहून अधिक संशयित डेंग्यूचे रुग्ण अाढळले. त्यापैकी ३५७ रुग्ण डेंग्यूबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

अाताघराेघरी जाऊन अंतर्गत फवारणी : डेंग्यूचाप्रसार करणाऱ्या एडीस या डासांचे प्रमाण घरातील अंतर्गत भागात असल्याचा शाेध अाराेग्य विभागाला लागला अाहे. त्यामुळे घराेघरी जाऊन धुरळणी फवारणी केली जाणार असल्याचे जीवशास्त्रज्ञ डाॅ. राहुल गायकवाड यांनी स्पष्ट केले. पेस्ट कंट्राेलच्या नवीन ठेक्याचे कामकाज सुरू झाले असून, तसे अादेशही त्यांना दिले अाहेत. सहाही विभागात माेठे फाॅगिंग मशीन वाहनेही देण्यात अाली अाहेत. विशेष म्हणजे, जूनच्या तुलनेत डासांची घनता ०.३५ ने कमी झाली असली तरी डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची घनता ०.८ ने वाढली अाहे. सद्यस्थितीत ०.८८ इतकी डेंग्यू डासांची घनता असून, ही शून्य असणे अभिप्रेत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...