आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य बँकेनेच ठेवले अवसायकाला अंधारात, सहा महिन्यांत दोनदा निविदा प्रक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पारनेरसहकारी साखर कारखाना विक्रीच्या प्रक्रियेबाबत राज्य सहकारी बँकेनेच कारखान्याच्या अवसायकाला अंधारात ठेवले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही निविदा विक्री प्रक्रियेची माहिती देण्यास राज्य बँकेने टाळाटाळ केली. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने गेल्या सहा महिन्यांत दोनदा कारखाना विक्रीची निविदा प्रक्रिया राबवली. निविदा प्रक्रियेतून कारखान्याच्या विक्रीचा व्यवहार पार पडूनही अवसायक असलेले येथील साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांना बँकेने कोणतीही माहिती दिलेली नाही.

पारनेर सहकारी साखर कारखाना दहा वर्षांपूर्वी अवसायनात काढण्यात आला. राजकीय कुरघोड्यांतून संचालक मंडळाची झालेली निवडणूक कर्जाच्या बोजातून कारखाना अवसायनात केला. कारखाना अवसायनात जाताना सन २००५ मध्ये राज्य बँकेचे ४५ कोटी १० लाख रुपयांचे कर्ज कारखान्याकडे थकले होते. गोपीनाथ मंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने वर्षांसाठी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला. सन २००६ ते २०११ पर्यंत वैद्यनाथने यशस्वीपणे गाळप केले. कराराची मुदत संपल्यानंतर मुंडे यांनी १० वर्षांसाठी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची केलेली मागणी राज्यस्तरावरील राजकारणातून फेटाळली गेली. त्यानंतर पुण्याच्या बीव्हीजी ग्रूपने दोन वर्षे भाडेतत्त्वावर हा कारखाना चालवला. भाडेकरारातून मिळालेेले १३ कोटी १५ लाख रुपये राज्य बँकेच्या कर्जखात्यात जमा झाले, तसेच कोर्ट गॅरंटीचे १२ कोटी ३४ लाख राज्य बँकेकडे वळते झाले. यातून बँकेची थकबाकी १९ कोटी ५२ लाखांपर्यंत खाली आली. त्यातही बीव्हीजी शुगर्सने एका वर्षाच्या भाडेकराराचे कोटी रुपये थकवले आहेत. त्यामुळे कामगारांनी त्यांनी काही साखर अडवून धरली आहे.

कारखान्याकडे १६० हेक्टर स्वमालकीची जमीन होती. पिंपळगाव जोगा कालव्याच्या टेल टँकसाठी त्यातील ६० हेक्टर जमीन कृष्णा खाेरे विकास महामंडळाने संपादित केली. या भूसंपादनाच्या मोबदल्यापोटी १२-१३ वर्षांपूर्वी कोटींपेक्षा अधिक रक्कम भूसंपादन अधिकाऱ्याकडे येऊन पडली आहे. मात्र, ज्ञानेश्वर कारखान्याने पुरवलेल्या उसाचे पैसे थकवल्याने पारनेर कारखान्याला देय असलेली ही रक्कम न्यायालयीन स्थगितीत अडकून पडली. सध्या कारखान्याकडे बिगरशेती केलेली ५३ हेक्टर जमीन आहे. कारखान्याच्या एकूण मालमत्तेचे सध्याचे बाजारमूल्य १७५ कोटींच्या घरात आहे.

जमीन विक्री किंवा भाडेकरारातून कर्जाची वसुली शक्य असतानाही बँकेने कारखाना विक्रीसाठी एप्रिल २०१५ मध्ये ८० कोटी रुपयांची निविदा काढली. प्रतिसाद मिळाल्याने जूनमध्ये ७४ कोटींची निविदा पुन्हा काढली. या प्रक्रियेतून ३१ कोटी ७१ लाख रुपयांच्या निविदेला बँकेने मंजुरी दिली असून विक्रीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत काही सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.
भूसंपादनाबाबत फेरमूल्यांकन करून सध्याच्या बाजारभावाने मोबदला द्यावा यातून बँकेची थकबाकी वळती करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली. राज्य बँकेच्या धोरणाविरोधात सभासदांनी मुख्यमंत्र्यांंकडे दाद मागितली आहे. दरम्यान, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम थकवल्याने पीएफ कार्यालयाने कारखान्याचा बॉयलर सील केला आहे.

पत्राला प्रतिसाद नाही
कारखान्याचाअवसायक या नात्याने निविदा विक्री प्रक्रियेची माहिती राज्य बँकेकडे मागितली. मात्र, यासंदर्भातील पत्रव्यवहाराला बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कारखान्याच्या विक्रीबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. बँकेकडून माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.'' मिलिंदभालेराव, अवसायक, पारनेर सहकारी साखर कारखाना.

प्रक्रिया पूर्णत्वाकडे
३१ कोटी ७१ लाखांच्या निविदेला मंजुरी मिळाली. निविदाधारकाने ७० टक्के रक्कम जमा केली. उर्वरित ३० टक्के रक्कम भरल्यानंतर कारखाना त्याच्याकडे सोपवण्यात येईल. सिक्युरायटेशन अॅक्टनुसार विक्रीचे सर्वाधिकार बँकेला आहेत. राज्याच्या अधिकारापेक्षा केंद्राचा कायदा वरचढ असून अवसायकाला कोणताही अधिकार नाही.'' प्रमोदकर्नाड, व्यवस्थापकीय संचालक, राज्य बँक.

राज्य बँकेचा अडेलतट्टूपणा
मार्च२०१५ अखेर कारखान्याची एकूण देणी ६५ कोटी ९३ लाख, तर एकूण येणी १६ कोटी रुपये आहेत. कारखान्यात १८९ कायम, तर २३९ हंगामी कामगार आहेत. कारखान्याच्या विक्रीतून कामगार देशोधडीला लागण्याची भीती आहे. जवळपास १५ हजार सभासदांना मालकी हक्कही गमवावा लागेल. कारखान्याच्या जमीन विक्रीतून कर्जाची परतफेड शक्य असताना राज्य बँक कवडीमोल दराने कारखान्याच्या विक्रीत मश्गूल आहे. यापूर्वीच्या अशाच विक्रीतून राज्य बँकेत गैरप्रकार झाल्याची चर्चा सुरू असून चौकशीची मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य बँकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.