आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशासाठी देणगी घेतल्यास शाळेला आता दहापट दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शिक्षण विभागातर्फे पूर्व प्राथमिक (नर्सरी) प्राथमिक (पहिली) इयत्तेच्या शाळा प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, येत्या मेपासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. शाळा प्रवेशासाठी देणगी इतर कोणत्याही प्रकारचा निधी घेतल्यास शाळा व्यवस्थापनाकडून दहापट दंड वसूल करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिला आहे.
बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रवेशप्रक्रिया राबवावी, प्रवेशाचे नियम वेळापत्रकाची योग्य अंमलबजावणी झाल्यास तसेच गैरप्रकार आढळल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते. तसेच, वयाच्या पुराव्याअभावी कोणत्याही बालकास शाळेत प्रवेश नाकारता येणार नाही, अशा सूचनाही दिल्या अाहेत. शाळा प्रवेशाबाबत पालकांकडून तक्रारी आल्यास त्या शाळेची प्रवेशप्रक्रिया रद्द करण्यात येईल, तसेच देणगी इतर कारणांसाठी निधी घेतल्यास त्या शाळेवर दहापट दंडाची कारवाई केली जाईल. शिक्षण विभागाने प्रवेशप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशा सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. प्रवेशप्रक्रियेवर शासनाचे नियंत्रण असल्याने पालक समाधानी आहे.
१५ आलेले अर्ज ३९५०
एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज एकूण जागा ५९००

शिक्षणहक्कची मुदत वाढवली
शिक्षणहक्ककायद्यांतर्गतआर्थिक दुर्बल घटकांतील गरजू मुलांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. अनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार आरटीईच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून, विहित मुदतीत १५ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. - प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी,जि. प. नाशिक
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या... कशी होईणार प्रवेशप्रक्रिया....