आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजदरप्रश्नी लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक, स्थानिक बैठकीसाठी तयारी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विदर्भ मराठवाड्यातील उद्याेगांना स्वस्त दरात वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला नसला तरी तशी पावले पडत असून ही दरमाफी अटळ अाहे. डी झाेनमधील उद्याेगांनाही त्यात दिलासा मिळणार असला तरी नाशिकचा त्यात समावेश हाेणार नसल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली अाहे. हा निर्णय झाल्यास त्याचे चटके नाशिककरांना सहन करावे लागणार असल्याने जनतेत संतापाची लाट अाहे. दरम्यान, हा तिढा सकारात्मकपणे सुटावा यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांकडेहीं बैठक घेण्याची तयारी स्थानिक लाेकप्रतिनिधींनी सुरू केली अाहे.
स्टील, प्लास्टिक माेल्डिंग, कास्टिंग, काेेल्ड स्टाेअरेजेस या उद्याेगांना या दरतफावतीचा फटका बसेल, तसेच यामुळे ७० टक्के उद्याेग प्रभावित हाेऊन लाखभर राेजगार संकटात येणार असल्याचे सांगितले जात अाहे. याविराेधात संतापाची लाट पहायला मिळत असून लाेकप्रतिनिधींनी मात्र सरकारला सकारात्मक निर्णय घ्यायला भाग पाडू, असा शब्द दिला अाहे. त्याच अनुषंगाने काही लाेकप्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांशी चर्चा केली असून, मुख्यमंत्र्यांसमवेत बसून हा तिढा मिटावा याकरिता बैठकीचे अायाेजन करण्याची तयारी सुरू झाली अाहे.

अाज विराेधी पक्षनेत्यांची भेट शक्य
विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नाशिकच्या दाैऱ्यावर असून, यावेळी नाशिकच्या उद्याेजक संघटनांचे प्रतिनिधी याच प्रश्नावर त्यांना भेटून चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली अाहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील सर्वच लाेकप्रतिनिधींनी एकत्रितपणे या मुद्यावर सरकारशी चर्चा करावी, अशी मागणी उद्याेजकच नाही तर कामगारांकडूनही व्यक्त हाेत अाहे.