आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue About Food Security In Kumbhamela In Nashik

लाखो भाविकांची ‘अन्न सुरक्षा’ अवघ्या सात निरीक्षकांच्या हाती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अन्नसुरक्षा निरीक्षक साधुग्राम परिसरातील दुकानांची तपासणी करून अन्नाचे नमुने घेताना. निरीक्षक कामाला लागले असले तरी, वरिष्ठांची मात्र उदासीनता दिसून ये - Divya Marathi
अन्नसुरक्षा निरीक्षक साधुग्राम परिसरातील दुकानांची तपासणी करून अन्नाचे नमुने घेताना. निरीक्षक कामाला लागले असले तरी, वरिष्ठांची मात्र उदासीनता दिसून ये
नाशिक- सिंहस्थकुं भमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अन्न
औषध प्रशासन विभागाकडे मनुष्यबळच नसल्यामुळे जिल्ह्याची जबाबदारी अवघ्या सात निरीक्षकांकडे देण्यात आली आहे. हे निरीक्षक त्या दृष्टीने कामाला लागले आहेत, तर दुसरीकडे, कुंभमेळा काळात अन्न तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत या विभागाचे वरिष्ठ अधिकारीच उदासीन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अन्न औषध प्रशासनातर्फे सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना दर्जेदार स्वच्छ अन्न उपलब्ध व्हावे, या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. सिंहस्थात नाशिकमध्ये जगभरातून भाविक येतात. या पार्श्वभूमीवर शहरातील पंचवटी, तपोवन आणि गोदाघाट परिसरासह शहराच्या विविध ठिकाणी मोहिमेंतर्गत प्रशासनाच्या पथकामार्फत खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक विक्री होणाऱ्या ठिकाणी भेटी देऊन स्वच्छतेच्या दृष्टीने तपासण्या करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, सिंहस्थाच्या या संपूर्ण कालावधीत अन्न तपासणीच्या या कामांसाठी प्रशासनाकडे मनुष्यबळ नसल्यामुळे फक्त सात निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निरीक्षकांकडे सिंहस्थ कामांसह इतर कामेही दिली जात असल्याने या विभागाकडून एक प्रकारे त्यांची पिळवणूकच होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंहस्थात विशेष मोहीम राबविण्याबाबत अन्न औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीच उदासीन असल्याचे चित्र आहे.

साहेबांचे अजब उत्तर
पर्वणीकाळातअन्न तपासणीबाबत ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने प्रश्न विचारला असता अन्न औषध प्रशासन सहायक अायुक्तांनी अजब उत्तर दिले. ते म्हणाले की, वाहनांना शहरात जाण्यास परवानगी नसल्याने अन्न तपासणी कशी काय करणार? मागील िसंहस्थ कुंभमेळ्यात मी स्वत: निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला माहीत अाहे की, कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना, तसेच साधूंना या काळात जे अन्न मिळते त्यापासून काहीही अपाय होत नाही!

अशी होणार कारवाई
सिंहस्थातआरोग्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा अधिनियम २००६ आणि २०११ मधील तरतुदीनुसार मावा, खवा, मेवा-मिठाई विक्री करणाऱ्यांकडील खाद्यपदार्थांत भेसळ अाढळल्यास कठाेर कारवाई केली जाईल. अनधिकृत मांस उत्पादक उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांवरही कठाेर कारवाई होणार अाहे. शहरात राबविलेल्या माेहिमेत लाखाे रुपयांचा गुटखा भेसळ केेलेले खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.