आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले मार्केटची दुरवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जुने नाशिक परिसरातील सर्वात जुनी मंडई म्हणून प्रसिद्ध असलेल्या महात्मा जोतिबा फुले मार्केटला सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या अतिक्रमणांनी वेढले आहे. तसेच, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मार्केटला मॉलचे स्वरूप देऊन नव्याने त्याच्या उभारणीसाठी हालचाली सुरू असल्या तरीही जोपर्यंत त्याला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत तरी हा प्रश्न कायम राहणार आहे.

जुने नाशिकच्या मध्यवस्तीत महात्मा जोतिबा फुले मार्केट बांधण्यात आलेले आहे. १९५३ मध्ये या मंडईचे बांधकाम पूर्ण झाले. जुन्या नाशिकमधील नागरिकांना सर्वप्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळाव्यात या हेतूने मार्केट उभारले गेले. मार्केटची उलाढालही लाखोंच्या घरात आहे. त्यामुळेच या ठिकाणी सर्वप्रकारचे ग्राहक वाढल्याने अनधिकृत व्यावसायिकांनी बाजाराला विळखा घातला. मंडईच्या बाहेर अतिक्रमण करून दुकाने थाटली.

या सर्व प्रकारामुळे मार्केटमधील अस्वच्छता वाढत गेली आणि महापालिका प्रशासनाचीही स्वच्छतेकडे डोळेझाक होत गेली. परिणामी येथे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

भाजीपाला, कागद, कचरा, उरलेले अन्नपदार्थ अशा सर्वच वस्तू येथे बाजूलाच टाकल्या जात असल्याने, त्या सडून सर्वदूर दुर्गंधी पसरलेली असते. असे असतानाही पालिका प्रशासनाने या सर्व प्रकाराकडे सोयीस्कर डोळेझाक सुरू ठेवली आहे.
या आहेत मुख्य समस्या
मार्केटच्याचारही बाजूंनी अतिक्रमणाचा वेढा पडलेला आहे. दुकानदारांनी थेट रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले आहे. फुले मंडईजवळच जुगाऱ्यांचा अड्डा भरतो. त्याचाही सर्वांना त्रास होतो. तसेच, परिसरात नियमित घंटागाडी फिरत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात.

मॉलच्या उभारणीसाठी पाठपुरावा सुरू
महापालिकेला महात्माफुले मार्केटला मॉलच्या स्वरूपात नव्याने बांधण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव असून, ते बीओटी तत्त्वावर देण्यासाठी अभियंत्यांची एक त्रिसदस्यीय समितीदेखील गठित करण्यात आली आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. -समिना मेमन, नगरसेविका

वाहनांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्थाच नाही
महापालिकेची पहिली मंडई अशी आेळख असलेल्या महात्मा जोतिबा फुले मार्केटकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या मार्केटची दुरुस्ती करून त्यात स्वच्छता करावी, अशी मागणी वारं‌वार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मंडईला पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक या ठिकाणी येणे टाळतात. -सर्फराज गफूर कोकणी, तक्रारदार
बातम्या आणखी आहेत...