आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेशमूर्ती गाळ्यांचा प्रस्ताव पाेलिस प्रशासनाच्या काेर्टात, दलालांमुळे अायुक्तांकडे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दरवर्षी जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेरील त्र्यंबकराेडवर रहदारीच्या रस्त्यावर गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या गाळ्यांमुळे हाेणारा वाद, शांतता क्षेत्राचा भंग रुग्णांची कुचंबणा अाता थांबणार अाहे. यंदा महापालिकेने ईदगाह मैदानासह शहरातील सहाही विभागांत जवळपास अडीचशे जागा गाळ्यांसाठी प्रस्तावित केल्या अाहेत. यासंदर्भात पाेलिस अायुक्तालयाकडे यादी पाठवली असून, त्यांच्या ‘ना हरकती’नंतर गाळ्यांच्या जागा अंतिम केल्या जाणार अाहेत.

त्र्यंबकराेडवरील गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या गाळ्यांवरून दाेन वर्षांपूर्वी प्रचंड वाद झाले हाेते. महापालिकेने परवानगी नाकारली असतानाही गणेशमूर्ती विक्रेत्यांनी दबंगगिरी करून गाळ्यांसाठी दबावतंत्र वापरले हाेते. वास्तविक, ही जागा जिल्हा रुग्णालयाजवळ असून, ते शांतता क्षेत्र असल्याचा अाक्षेप हाेता. गणेशमूर्ती खरेदीसाठी येणारे भाविक, ढाेल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या मिरवणुकांमुळे रुग्णांना त्रास हाेण्याच्या घटनाही घडल्या हाेत्या.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने विक्रेत्यांच्या मागणीनुसार संबंधित जागेवर परवानगी देण्याचा निर्णय पाेलिस अायुक्तालयाच्या काेर्टात पाठवला हाेता; मात्र पाेलिस महापालिकेच्या वादात प्रकरण भिजत पडले. तिकडे गणेशाेत्सव ताेंडावर अाल्याचे कारण देत मूर्तीविक्रेत्यांनी परस्पर मंडप उभारून गाळ्यांचा ताबाही घेतला हाेता. या सर्व प्रकरणात माेठे अर्थकारण झाल्याची चर्चा त्यावेळी हाेती. दरम्यान, पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळाच असल्यामुळे संबंधित रस्ता भाविक मार्गाचा भाग असल्याने गाळे उभारणीचा विषय टळला हाेता. यंदाही गणेशमूर्ती विक्रेत्यांनी महापालिकेकडे अर्ज करून जागेची मागणी केली अाहे. त्यानुसार महापालिकेच्या विविध कर विभागाने पाेलिस अायुक्तालयाकडे जवळपास अडीचशे जागा निश्चित करून ना हरकत प्रमाणपत्र मागितले अाहे.

पाेलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर महापालिका संबंधित जागेवर मंडप उभारण्यासाठी परवानगी देईल त्यानंतर विक्रेत्यांकडून मंडप उभारून विक्रीसाठी स्टाॅल तयार करण्याची पारंपरिक पद्धत अाहे. सर्वाधिक शंभर गाळे ईदगाह मैदानाच्या पूर्व बाजूकडील भिंतीलगत उभारले जाणार अाहे. त्याखालाेखाल नाशिकराेड, सिडकाेतील शिवाजी चाैक अन्य परिसर, सातपूर क्लब हाऊस, पंचवटीतील अारटीअाे काॅर्नर अशा विविध भागात गाळे उभारणी प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरवर्षी गणेशमूर्ती विक्रेत्यांसाठी तयार हाेणाऱ्या स्टाॅल उभारणीसंदर्भात चालणाऱ्या अर्थकारणाची माेठी चर्चा असते. त्यातून महापालिकेचे उत्पन्न तर बुडतेच, िशवाय सामान्य विक्रेत्यांकडून माेठे भाडेही अाकारले जाते, असेही सांगितले जाते. एका मूर्तीविक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने स्वत: मंडप उभारून गाळे उभारले तर अधिक महसूल मिळू शकेल. त्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर गाळे उभारून लिलाव पद्धतीने प्रतिदिन भाडे अाकारणी केली पाहिजे. सद्यस्थितीत महापालिका केवळ जागा देते. काही राजकारण्यांशी संबंधित तथाकथित भाईंकडून जागा भाड्याने घेऊन मग त्यावर गाळे उभारले जातात. या गाळ्यांच्या हिशेबानुसार महापालिकेला भाडे वेगळे भरले जाते प्रत्यक्षात विक्रेत्याकडून भाडे त्यापेक्षाही अधिक घेतले जाते. त्यासाठी हे भाई अापल्याच शागीर्दाच्या नावाने गाळे घेऊन त्यानंतर पाेटभाड्याने देत धंदा करतात. त्यामुळे यंदा अायुक्तांनी स्वत: मंडप उभारून लिलाव पद्धतीने प्रत्येक गाळ्याचे वाटप केल्यास खराेखरच गरजूंना लाभ हाेईल गैरप्रकारही टळतील.

पाेलिसांकडून परवानगी अाल्यावर वाटप
शहरात ईदगाह मैदानासह जवळपास अडीचशे ठिकाणी गणेशमूर्ती विक्रेत्यांना गाळ्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव अाहे. पाेलिसांकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केले असून, त्यांची परवानगी अाल्यानंतर पुढील कारवाई हाेईल. -अार. एम. बहिरम, उपायुक्त
बातम्या आणखी आहेत...