आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घंटागाडीतील काेटीच्या काेटी उड्डाणांना अायुक्तांचा दणका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- १९लाख लाेकसंख्या दाखवून त्याप्रमाणात हाेणाऱ्या कचऱ्याच्या निर्मितीचे कारण देत १७६ काेटी रुपयांचा घंटागाडीचा ठेका देण्याच्या प्रस्तावाची तपासणी केल्यानंतर अखेर नवनिर्वाचित अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याचे सांगत निश्चितच काेटीच्या काेटी उड्डाणांना ब्रेक लावला जाईल, असे स्पष्टीकरण पत्रकारांशी बाेलताना दिले.
लाेकसंख्या वाढीचा दाेन टक्के वेग अपेक्षित असताना, प्रस्तावात चक्क पाच टक्के वाढ केल्याचेही निदर्शनास अाले असून, या एकूणच प्रस्तावाबाबत अहवालवजा खुलासाही अाराेग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांच्याकडून मागितल्याचे त्यांनी सांगितले.

पाच वर्षांसाठी पालिकेने घंटागाडी ठेका देताना १७६ काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला हाेता. विशेष म्हणजे, कचरा निर्मितीचा संबंध लाेकसंख्यावाढीशी जाेडताना ती अधिकाधिक कशी फुगेल, याची दक्षता घेतल्याचेही दिसत हाेते. म्हणूनच की काय साडेएकोणावीस लाख लाेकसंख्या गृहीत धरून त्या अाधारावर पाच वर्षांच्या कचऱ्याचे गणित केले हाेते. वास्तविक, सद्यस्थितीत दैनंदिन ४०० मेट्रिक टन कचरा संकलित हाेत असताना, त्या अाधारावर नियाेजन हाेणे अपेक्षित हाेते. कचऱ्याला प्रतिटनामागे महापालिकेकडून पैसे दिले जाणार असल्यामुळे लाेकसंख्यावाढीचा संबंध संभ्रमात करणारा ठरला हाेता. विशेष म्हणजे, एक मेट्रिक टन कचऱ्यासाठी १६४१ रुपये याप्रमाणे ४०० मेट्रिक टनासाठी वर्षाकाठी हिशेब केल्यास साडेतेवीस काेटींपर्यंत अाकडा जात हाेता. त्यास पाचने गुणल्यास ११५ काेटींपर्यंत ठेका हाेत हाेता. वार्षिक कचरावाढीचा वेग गृहीत धरला तर साधारण १३० काेटींपर्यंत ठेका जाऊ शकत हाेता. या एकूणच ५० काेटींच्या फुगवट्याविषयी अाराेग्याधिकारी डेकाटे शनिवारी पत्रकार परिषदेत ठाेस उत्तर देऊ शकत नसल्यामुळे संशय निर्माण झाला. त्याची कृष्णा यांनी गंभीर दखल घेत संपूर्ण प्रस्तावाची साेमवारी तपासणी केली. त्यात अनेक त्रुटी अाढळल्या.

असालागेल भ्रष्टाचाराला चाप : कृष्णायांनी माजी अायुक्त डाॅ. गेडाम यांनी तयार केलेल्या अटीतील एकही अट बदलली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. १६ लाख लाेकसंख्येप्रमाणे प्रतिमाणसी हाेणाऱ्या कचरा निर्मितीचा हिशेब जवळपास ५०० मेट्रिक टनापर्यंत जाईल. त्यामुळे ५० काेटींचा वगैरे फरक शिल्लक राहणार नाही, मात्र त्यातील निश्चितच अाकडे कमी हाेतील. याबराेबरच स्वयंचलित काट्यावर येणाऱ्या कचऱ्याची नाेंद संगणकाद्वारे सर्व्हरवर हाेणार असल्यामुळे त्यात फेरफार करण्याची संधी राहणार नाही. सीसीटीव्हीचा वाॅचही असणार अाहे. शिवाय खत प्रकल्प सुरू झाल्यानंतर चांगल्या प्रतवारीचे खत निर्मिती करण्यासाठी संबंधित ठेकेदारच मातीमिश्रित कचरा स्वीकारणार नाही. त्यामुळे टनाप्रमाणे जादा पैसे कमवण्यासाठी ठेकेदाराकडून गैरप्रकार हाेणार नाही, असा विश्वास कृष्णा यांनी व्यक्त केला.
लाेकसंख्येत दाेन ते अडीच टक्के प्रतिवर्षी वाढ अपेक्षित असते. घंटागाडीच्या प्रस्तावात मात्र पाच टक्के लाेकसंख्यावाढ गृहीत धरण्यात अाली. एवढेच नव्हे तर यापूर्वीच्या ठेक्यातही असाच रेषाे धरण्यात अाला हाेता. दाेन टक्के वाढीचा विचार केला तर १६ लाख १७ हजारांपर्यंत लाेकसंख्या जाईल, असे कृष्णा यांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे, खुद्द अायुक्तांसमाेर कचरा संकलनाचे दाेन वेगवेगळे गणित मांडले गेले. त्यात एका ठिकाणी प्रतिमाणसी कचरा निर्मितीसाठी ३०० ग्रॅम, तर एका ठिकाणी साडेतीनशे ग्रॅम असेही दाखवले गेले. त्यामुळे अायुक्तांनी अाराेग्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला अाहे. दरम्यान, या प्रकरणाविषयी अायुक्त साेमवारी अाढावा घेणार असल्याचे यापूर्वीच प्रसिद्ध झाले हाेते. याेगायाेग म्हणजे, साेमवारी अाराेग्याधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे अखेरीस अतिरिक्त अायुक्त अाराेग्य विभागाकडून कृष्णा यांनी अाढावा घेतला.
बातम्या आणखी आहेत...