आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घंटागाडी ठेकेदारांच्या बिलातून कापणार पैसे कामगार अायुक्तालयाकडे करणार तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या पाचशे घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारीपासून किमान वेतन लागू करण्यासंदर्भातील लढ्याला अाता काेठे यश मिळत असल्याचे चित्र अाहे. अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांनी शुक्रवारी (दि. ६) राेखठाेक भूमिका घेत अाराेग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांना ठेकेदारांनी किमान वेतनाची अंमलबजावणी केल्यास वाढीव रक्कम त्यांच्या बिलातून कापून कर्मचाऱ्यांना देण्याचे अादेश दफले. एवढेच नव्हे, तर किमान वेतनासंदर्भात कामगार अायुक्तालयाचे अादेश कसे डावलले, याबाबत तक्रार करून ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली जाणार अाहे.
फेब्रुवारीपासून वाढीव किमान वेतन त्याचा फरक मिळण्यासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे अांदाेलन सुरू आहे. जवळपास दोन काेटी रुपयांची फरकाची रक्कम िदवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळविण्याचा प्रयत्न हाेता. प्रत्यक्षात कामगार उपायुक्तालयाकडून घंटागाडी कर्मचाऱ्यांना संबंधित कायदा लागू हाेताे की नाही, याबाबत संदिग्ध मार्गदर्शन येत असल्यामुळे वाद पेटत गेला. अखेर प्रश्न कामगार अायुक्तांच्या काेर्टात गेल्यावर त्यांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन अनुज्ञेय हाेत असल्याचा निर्वाळा िदला. त्यानुसार, अाराेग्य विभागाने ठेकेदारांना वाढीव वेतनाचा लाभ देण्याचे अादेश दिल्यावर त्यांच्याकडून अाता घंटागाडीचा मूळ ठेका संपला असून, मुदतवाढीच्या कालावधीत वाढीव वेतनाचा लाभ कसा द्यायचा, असा मुद्दा उपस्थित केला जात अाहे. त्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा भिजत पडत असल्याचे बघून शुक्रवारी पुन्हा महापालिका प्रवेशद्वारावर अांदाेलन करण्यात अाले. त्यानंतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महादेव खुडे यांनी अतिरिक्त अायुक्त साेनवणे यांची भेट घेतल्यावर त्यांनी कामगार अायुक्तांच्या पत्रानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणार असल्याचे जाहीर केले. यासंदर्भात ठेकेदारांना अादेश दिले असून, त्यांनी पालन केल्यास त्यांच्या नियमित बिलातून रक्कम कापून कर्मचाऱ्यांना िदली जाईल. एवढ्यावरच थांबता ठेकेदारांवर कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून कारवाईसाठी कामगार अायुक्तालयाकडे तक्रार करण्याचे अादेश अाराेग्याधिकाऱ्यांना िदले.
कामगार अायुक्तांचे पत्र असल्यामुळे ठेकेदारांची भीडभाड ठेवता घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन ठेकेदार अदा करीत नसेल तर त्यांच्या वेतनातून कपात करण्याचे अादेश अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी िदले अाहेत. विशेष म्हणजे, अायुक्तांकडून कारवाईचे अादेश असताना अाराेग्य विभागाकडून सायंकाळपर्यंत कारवाईचे अादेश निघत नसल्यामुळे संशय व्यक्त केला जात अाहे. अाराेग्य विभागाच्या संशयास्पद कार्यपद्धतीविषयी अतिरिक्त अायुक्तांकडेही कर्मचारी संघटनेने तक्रार केली.
बातम्या आणखी आहेत...