आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफांसाठी उद्धव ठाकरेही उतरणार रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आंदोलनाची दिशा तुम्ही ठरावा. तुमच्या आंदोलनात आमचा शिवसैनिक तुमच्या खांद्याला खांदा लावून लढल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नव्हे, तर मुंबईत होणाऱ्या प्रस्तावित मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख स्वतः तुमच्यासोबत रस्त्यावर उतरणार असल्याचे सूतोवाच शिवसेनेचे संपर्कप्रमुख अामदार अजय चौधरी यांनी केला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या सराफांच्या लाक्षणिक उपोषण स्थळाच्या भेटीप्रसंगी रविवारी (दि. १०) ते बोलत होते.
केंद्र शासनाने सराफी व्यवसायावर लादलेला अबकारी कर संपूर्णतः रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवार (दि. ९)पासून सराफ व्यावसायिकांच्या वतीने तीन दिवसांचे लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले अाहे. उपोषणार्थींमध्ये राजेंद्र भावसार, रमेश वाखारकर, अनिल दुसाने, सुनील वाघ, ईश्वर सोनवणे, दीपक शिऊरकर आदींचा समावेश आहे. गेल्या चाळीस दिवसांपासून सुरू असलेले सराफांचे अबकारी कराविरोधातील आंदोलन आता आणखी तीव्र होताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागातील सराफ व्यावसायिकांनी शनिवारपासूनच या साखळी उपोषणात सहभाग नाेंदवून सरकारचा िनषेध केला. रविवारी अामदार अजय चाैधरी यांनी उपाेषणार्थींची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विनायक पांडे, अजय बोरस्ते, विनायक खैरे, डी. जी. सूर्यवंशी, दिलीप दातार आदींसह नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर, राजेंद्र दिंडोरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राज्यभरात सराफांची एकजूट दिसून येत आहे. मात्र, तरीही काही व्यावसायिक दुकाने उघडी ठेवत असून, त्यांना विनंती करूनही त्यांनी ऐकले नाही, तर शिवसेना स्टाइलने त्यांचा समाचार घेणार असल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले, नरहरी सेनेचे पदाधिकारी यांनीही रविवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सराफ व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
सराफ व्यावसायिकांना भेटून त्यांना पाठिंबा देताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख अामदार अजय चाैधरी. समवेत अामदार याेेगेश घाेलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, अजय बोरस्ते, विनायक पांडे अादी.

उद्याच्या बैठकीत ठरविणार दिशा
दरम्यान,नवी दिल्ली येथे देशातील २८ राज्यांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात गेल्या ४० दिवसांपासून अबकारी कर हटविण्यासाठी सुरू असलेले आंदोलन येत्या १२ एप्रिलपर्यंत सुरूच राहणार असल्याचे ऑल इंडिया ज्वेलर्स अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांनी स्पष्ट केले आहे. १२ तारखेला ऑल इंडिया ज्वेलर्सची बैठक झाल्यानंतर जो काही सर्वानुमते निर्णय होईल त्याप्रमाणे देशभरातील सराफांच्या संघटना आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे रांका यांनी म्हटले आहे.