आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवाकर चुकवल्याबद्दल सावानास १५ लाख दंड, सहअायुक्तांची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेला सेवाकर चुकविल्याबद्दल तब्बल १५ लाख ६८४ रुपये दंड करण्यात अाला अाहे. केंद्रीय उत्पादन, सीमाशुल्क तथा सेवाकर विभाग, नाशिकचे सहअायुक्त डी. एस. मीना यांनी ही कारवाई केली अाहे.
वाचनालयाच्या वास्तू, अर्थात प. सा. नाट्यगृह, फ्रेनीबाई दस्तूर हाॅल, मु. शं. अाैरंगाबादकर सभागृहाखालील हाॅल विविध कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शने यासाठी भाड्याने देण्यात येतात. ही रक्कम संस्था देणगी या सदराखाली दर्शवून केंद्रीय सेवा कर विभाग अायकर विभागाची फसवणूक करण्यात अाली, असे सावानाचे माजी कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले अाहे. फेेब्रुवारी २०१४ मध्ये गाेपनीय चाैकशी सुरू झाल्यानंतर कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांना समन्स बजावून चाैकशीस बाेलावले. यावेळी जहागिरदार यांनी संस्था सार्वजनिक न्यास असल्याने सेवाकर लागू नाही, तसेच देणगी घेत असल्याने सेवाकराचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका मांडल्याचे पत्रकात म्हटले अाहे. जून २०१४ मध्ये ‘इमूव्हेबल प्राॅपर्टी’ या सदराखाली सेवाकर विभागाकडे नाेंदणी करून जुलै २०१२ या कालावधीतील सेवाकर पाच लाख ५५ हजार ५०६ रुपये अाणि त्यावरील व्याज ७०, ७०६ रुपये सावानाने जमा केला. कर विभागाने २००९-१० ते २०१३ ते १४ या कालावधीतील करपात्र उत्पन्न एक काेटी ३३ लाख ८४, ६०४ रुपये असल्याने त्यावर १५ लाख ६८४ रुपये सेवाकर भरण्यास सांगितले अाहे.

संस्थेचे नुकसान...
अाॅडिट रिपाेर्ट पाहताना ही बाब लक्षात अाली तेव्हाच मी अावाज उठवला हाेता. पण, सनदी लेखापाल हेरंब गाेविलकर यांनी सेवाकर विभागाची माफी याेजना येते, तेव्हा ताे नियमित करून घेऊ, असे सांगितलेे. हे त्या वेळच्या इतिवृत्तातही सापडेल. अाताच्या कार्यकारिणीतील अाैरंगाबादकर, जुन्नरे यांच्यासह इतर त्या कार्यकारिणीतही हाेते. पण, प्रकरण अंगाशी येईल म्हणून त्यांनी राजीनामा देऊन पळ काढला. नंतरच्या कार्यकारिणीत अाल्यावर त्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे हाेते. २०१२ पासून संस्थेचा सेवाकर भरला असेल तर मग मागील सेवाकराचा प्रश्नच येत नाही. मी वा अामची कार्यकारिणी याला जबाबदार नाही. -श्रीकांत बेणी, तक्रारदारमाजी कार्यवाह, सावाना

थकित कर बेणींच्याच काळातील...
अामचेकार्यकारीमंडळ २०१२ मध्ये सक्रिय झाले अाणि तेव्हापासून अाम्ही अाजपर्यंतचा सेवाकर नियमित अदा करत अाहाेत. २००९ पासून सेवाकर संस्थेने द्यावा हे मान्य नसल्याने कर सल्लागारांच्या सल्ल्याने केंद्रीय उत्पादन सीमा शुल्क विभाग, नागपूर यांच्याकडे अपीलही दाखल केले अाहे. हे पैसे भरायला पाहिजे असे बेणींचे म्हणणे असेल तर हा गाेंधळ त्यांच्याच काळातील अाहे. तरीही कायदेशीर मार्गाने संस्थेचे पैसे वाचवण्याचा विचार करताे अाहाेत. अाम्ही हे पैसे भरले तर त्यातील २० टक्के रक्कम तक्रारकर्त्याला, म्हणजे बेणींना हवी असल्यानेच हा खटाटाेप अाहे. मिलिंद जहागिरदार, कार्यवाह,सावाना
बातम्या आणखी आहेत...