आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीमुळे हाेणार करप्रणाली सुलभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देशात येऊ घातलेल्या एकत्रित करप्रणाली (जीएसटी)मुळे देशाच्या सकल उत्पन्न दरात (जीडीपी) वाढ हाेऊन व्यवहारांवरील खर्च कमी हाेऊन प्रक्रियाही सुलभ हाेईल. तसेच कर भरण्यासाठीची कसरत कमी हाेऊन खऱ्या अर्थाने ‘इस अाॅफ डुइंग बिझिनेस’ व्यावसायिकांना या देशात करता येईल, असे प्रतिपादन करप्रणालीचे तज्ज्ञ अार. व्यंकटाचलम यांनी केले.
अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या अायमा रिक्रिएशन सेंटरमध्ये ‘जीएसटी करप्रणाली तिचे फायदे’ या विषयावरील कार्यशाळेत ते बाेलत हाेते. व्यासपीठावर टॅक्सेशन कमिटी अाॅफ इन्स्टिट्यूट अाॅफ काॅस्ट अकाउंट‌्स अाॅफ इंडियाचे सीएमई प्रकाश नवल, अायमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे, सेमिनार कमिटीचे चेअरमन धनंजय दीक्षित हाेते.
ते म्हणाले, ‘डेस्टिनेशन बेस टॅक्स’ अशी जीएसटीची संकल्पना असून, मूल्यवर्धनावरीलच कर, करप्रणालीत सुलभता अाणणारा कर एक देश एक करप्रणाली, एकाच प्रकारे भरता येणारा कर अशा विविध संकल्पना या करामागे अाहेत. जीएसटी ही एक पारदर्शक अाणि सुलभ अशी पेपरलेस प्रक्रिया असेल, ज्याची प्रतीक्षा देशभरातील उद्याेजक-व्यावसायिकांना असल्याचे सांगून ते म्हणाले की, स्वत:ची अायटीसी सिस्टिम असलेल्या या कररचनेमुळे ‘एक देश एक करप्रणाली’ असेल. ज्यामुळे देशभरात व्यवसाय करताना सुलभता येणार असल्याकडे लक्ष वेधतानाच या करप्रणालीचे फायदेही त्यांनी विशद केले.
जीएसटी हा गेमचेंजर ठरणार असून, ताे उद्याेजकांच्या हिताचाच असल्याचे अशाेक नवल यांनी या वेळी मार्गदर्शन करताना सांगितले. याचा फायदा उत्पादन करणारे, वितरक या सर्वच साखळीला हाेणार असल्याकडे लक्ष वेधत जीएसटी लागू झाल्यानंतर इतर करांचे प्रमाण माेठ्या प्रमाणावर कमी हाेऊन संपूर्ण देशात एकच कर भरावा लागेल, असेही नवल यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन धनंजय दीक्षित यांनी केले, तर व्यंकटेश मूर्ती यांनी अाभार मानले.
अायमाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना करप्रणाली तज्ज्ञ अार. व्यंकटाचलम. समवेत प्रकाश नवल, अायमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे, धनंजय दीक्षित अादी.
बातम्या आणखी आहेत...