आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एचअाेअाय एजंटवर फसवणुकीचा गुन्हा, संचालकांचा दावा फोल, आयुक्तांकडून दखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- व्यावसायिक गाळे आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेवर व्याज देणाऱ्या हाउस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांसह दहा एजंटच्या विरोधात सुमारे पावणेचार लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. २०) गंगापूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती आणि गणेश देसाई (रा. शंकरनगर) यांच्या फिर्यादीनुसार हाउस ऑफ इन्व्हेस्टमेंटचे संचालक आणि एजंट संशयित विनोद बाळू पाटील, सुशांत रमेश कोठुळे, भगवंत कोठुळे, महेश नेरकर, अनिल निवृत्ती कोठुळे, रवींद्र पुंडलिक दळवी, दर्शन विजय शिरसाठ, सतीश कामे, विजय खूनकर, सुरेखा जेजूरकर यांनी या कंपनीच्या व्यवसायी गाळे तसेच परदेशात गुंतवणूक करण्याचे त्या गुंतवणूक केलेल्या रकमेवर दरमहा व्याज देण्याचे अामिष दाखवत लाख ७५ हजारांची रक्कम वेळोवेळी घेतली.

या कंपनीत गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा घेण्यास गुंतवणूकदार गेले असता संशयितांनी रक्कम टाळाटाळ करत दमदाटी केली. अखेर सर्व कागदपत्रांसह गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी यापूर्वी कंपनीच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सुरू असल्याने तक्रारीचे गांभीर्य घेत तत्काळ गुन्हा दाखल केला. कंपनीकडून सुमारे २० कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आणखी तक्रारदार आणि फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तक्रारदारांची संख्या वाढणार
कंपनीमध्ये शहरआणि जिल्ह्यातील सुमारे तीन हजार गुंतवणूकदार आहेत. या गुंतवणूकदारांची सुमारे २० कोटींची गुंतवणूक असल्याचा अंदाज आहे. तक्रारदार पुढे आल्यास फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. -सचिन गोरे, सहाय्यक आयुक्त (गुन्हे)

मासिक परताव्याचे अामिष
हाउसऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांकडून रिअल इस्टेट, शेअर बाजार, व्यावसायिक संकुल, फार्म हाऊस अादी क्षेत्रात गुंतवणूक केल्यास गुंतवणूक केलेल्या रकमेवर दर महिन्याला परतावा देण्याचे अामिष संचालकांकडून देण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी गंगापूररोडवरील कार्यालय गुंतवणूकदारांनी फोडले. त्यावेळी कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांना त्यांच्या सर्व ठेवी परत करण्याचे अाश्वासन दिले हाेते.

संचालकांकडून गुंतवणूकदारांच्या ठेवी परत देण्याचे अाश्वासन देण्यात आले होते. पोलिसांना संचालकांकडून प्रतिज्ञापत्र देण्यात आले होते. मात्र, दरम्यानच्या काळात आर्थिक गुन्हे शाखेकडून कंपनीच्या संचालकांची चौकशी सुरू असताना एका गुंतवणूकदाराने संचालकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा दिला. ही चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. कंपनीचा मुख्य संचालक हा बाजार समितीच्या एका संचालकाचा जावई असल्याने तपासात दिरंगाई होत असल्याचा अर्जदेखील काही गुंतवणूकदारांनी पोलिस आयुक्तांना दिला. या सर्व प्रकाराची दखल घेत पोलिस आयुक्तांच्या आदेशाने कंपनीच्या संचालक आणि एजंटच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...