आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीतील वाद सुळे, भुजबळांच्या काेर्टात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राष्ट्रवादी शहराध्यक्ष पदासाठी अाक्रमक हाेण्याच्या नादात वाढती गटबाजी बदनामी हानिकारक असल्याची बाब नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी थेट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत नेली अाहे. या प्रकरणी अंतिम ताेडग्याची जबाबदारी सुळे तुरुंगात असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर साेपविण्यात अाल्याचे वृत्त अाहे. यासंदर्भात सुळे यांनी पुढील अाठवड्यात भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे सांगत त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितल्याचे बाेलले जाते.

भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर राष्ट्रवादीतील गटबाजी चांगलीच उफाळून अाली हाेती. ग्रामीणमध्ये तर राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष इतका विकाेपाला गेला की, टक्केवारीचे जाहीर अाराेप तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष हटाव माेहीमच सुरू झाली अाहे. दुसरीकडे शहरात शहराध्यक्ष अामदार जयवंत जाधव यांच्याविराेधात गजानन शेलार, अनिल चाैघुले, अशाेक सावंत, माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यासारख्या अलीकडे संघटनेत दुर्लक्षित असलेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी माेहीम उघडल्याचे चित्र अाहे. मध्यंतरी या गटाने शहराध्यक्ष विश्वासात घेत नसल्याची तक्रार केली; मात्र जाधव यांनी संयम सबुरीने त्याकडे काणाडाेळा करीत संघटनेचे काम सुरू ठेवले हाेते. दरम्यान, शहर जिल्ह्यातील वाद थांबत नसल्याचे पाहून प्रदेशाध्यक्षांनी जिल्हा प्रभारी म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जबाबदारी सोपवली. आव्हाड यांनी शहर जिल्ह्याची एकत्रित बैठक घेतली असता त्यात, शहराध्यक्ष हटाव मोहिमेचा नारा देत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच इच्छुक असलेल्या शेलार यांच्या गटाने अजित पवार यांची भेट घेऊन फेरबदलाची मागणी केल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, जाधव यांचे समर्थक नगरसेवक पदाधिकाऱ्यांनीही पवार, तटकरे अाव्हाड यांच्यासमोर त्यांची बाजू मांडली. पक्षविराेधातील वातावरणनिर्मिती वाढत्या गटबाजीचा फटका बसेल अशी भीती व्यक्त केली. यावेळी सुळे याही उपस्थित होत्या. दोन्ही गटांचे म्हणणे एेकून घेतल्यानंतर नाशिकचा निर्णय भुजबळ यांच्याकडेच साेपवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पुढील आठवड्यात सुळे भुजबळ यांना भेटणार असून त्यावेळी नाशिकसंदर्भात काय निर्णय घ्यायचा, हे भुजबळ यांना विचारले जाईल असे त्यांनी सांगितल्याचे समजते.
चुंभळे प्रकरणी१७ जूनला बैठक :
जि.प. अध्यक्ष चुंभळे यांच्याविराेधातील माेहीम थांबवण्याबराेबरच नाराज राष्ट्रवादी सदस्यांची बाजू एेकून घेण्यासाठी १७ जूनला जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी बैठक बाेलवल्याचे वृत्त अाहे. बुधवारी महिरावणी येथे अध्यक्षांविराेधात बैठक घेतल्यानंतर पवार, तटकरे यांच्याकडे जाण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला हाेता. एक प्रकारे स्थानिक अध्यक्षांवर अविश्वासाचे हे चित्र हाेते. या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादी गटनेते रवींद्र देवरे, सदस्य नितीन पवार यांनी पगार यांना सदस्यांची बाजू सांगितली.
बातम्या आणखी आहेत...