आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेवीदारांचा डाटाच नाही! तपासात अडचणी; केबीसीची मालमत्ता विक्री प्रक्रिया सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मैत्रेयच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळण्यास सुरुवात झाल्याने केबीसी, विकल्प आणि इमुच्या यापूर्वी फसवणूक झालेल्या ठेवीदारांना ठेवी परत मिळण्याची अाशा लागली आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि शासनाच्या वतीने केबीसी कंपनीची सुमारे शंभर कोटींच्या मालमत्ता विक्री करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र कंपनीच्या ठेवीदारांचा डाटाच कंपनी अाणि तपास ‌विभागाकडे उपलब्ध नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत कशा कराव्यात याबाबत यंत्रणेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केबीसी कंपनीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण यांच्या शहर आणि जिल्ह्यातील स्थावर आणि जंगम मालमत्तेचा लिलाव करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. सोने, शेती, प्लॉट, वाहन, इमारती आणि इतर अशी सुमारे शंभर ते दीडशे कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. यापैकी काही मालमत्ता विक्री करण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानुसार शासनस्तरावर सुरू झाली आहे. एस्क्रो खाते उघडण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

केबीसीसह इतर कंपन्यांचे ठेवीदार आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी करत अाहेत. आमच्या ठेवी कधी परत मिळणार याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली जात असून या ठेवीदारांना समजवताना अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. लिलाव केल्यानंतर या माध्यमातून आलेला पैसा शासनाकडे जमा होणार असल्याने ठेवी वाटप होण्यास कालावधी लागेल.

केबीसी, इमु, विकल्प या कंपन्यांनी ठेवीदारांना प्रलोभन देत कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्या. त्या बदल्यात त्यांना ठेवी ठेवल्याचे प्रमाणपत्र दिले. मात्र या ठेवीदारांच्या कायमस्वरूपी माहितीचा डाटा कंपनीच्या संचालकांनी जतन केल्याने ठेवीदारांनी नेमकी किती गुंतवणूक केली याबाबत कंपनी अाणि ठेवीदारांच्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळली आहे.
बातम्या आणखी आहेत...