आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्टर मधील साधू असुविधेमुळे परतीला...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पहिलीपर्वणी तोंडावर आलेली असताना अद्यापही अनेक साधू-महंतांना मूलभूत सुविधाच मिळाल्या नसल्याने काही साधू आपला डेरा उचलण्याच्या तयारीत आहेत. पाण्यासारखी मूलभूत सुविधाही देऊ शकत नाही, असा कुंभमेळा आणि अधिकारी कुठेही बघितले नाहीत, असा संताप सेक्टर मधील साधूंनी व्यक्त केला. विशेष म्हणजे ध्वजारोहण सोहळ्यात सुविधांचे मोठे कौतुक झाले. त्यानंतर काही वेळातच १५-२० साधू अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सोहळास्थळाकडे निघाले. पण, ते अधिकाऱ्यांची भेट घेऊ शकले नाहीत.
कुंभपर्वातील प्रारंभ अर्थातच, आखाड्यांतील ध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडला. आता पहिली पर्वणी १० दिवसांवर येऊन ठेपली असून, खालशांमध्ये साधू-महंतांची गर्दी होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी अन्नछत्र सुरू झाले आहे. पण, सेक्टर मधील खालशांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधाच मिळालेली नाही. पाण्याच्या टाक्याच या भागात बसविलेल्या नाहीत. केवळ पाणीच नाही, तर अनेक खालशांमध्ये मातीचे ढिगारेही पडलेले आहेत. शौचालयांतील पाणी निचऱ्याला जागाच नाही, त्यामुळे तात्पुरत्या केलेल्या गटारांमध्ये हे पाणी साचून राहिले आहे. परिणामी मोठी दुर्गंधी पसरली आहे. लेनमधील रस्तेही फारच लहान असल्याने दोन मोठ्या गाड्या एकाच वेळी रस्त्यावर असतील, तर लगेचच अडचणीचे होते. खालशांच्या जागांनाही पार्किंगची व्यवस्था देण्यात आलेली नाही. यामुळे या परिसरातील साधू-महंत आपले बांधलेले तंबू तसेच ठेवून इतर साहित्याची बांधाबांध करत आहेत. येथील साधूंनी तर इकडे पोलिसही फिरकत नसल्याचे सांगितले. एका खालशात दोन दिवसांपूर्वी मद्यपींनी गोंधळ घातला होता. दुसऱ्या एका खालशात भांड्यांची चोरी झाली. यामुळे येथील खालसेकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असल्याचे मत महंतांनी व्यक्त केले. ध्वजारोहण सोहळ्यात कुंभपर्वाची व्यवस्था उत्तम असल्याबद्दल अनेकांनी अनेकांचे कौतुक केले आहे. पण, साधुग्राममधील मुख्य मार्ग सोडले, तर अातील लेनमध्ये आजही अनेक असुविधा असल्याने साधूंनी नाराजी व्यक्त करीत, सुविधा तत्काळ मिळाल्या नाही तर परत निघून जाऊ, असा इशारा दिला आहे.

प्रशासनाकडून तक्रारींकडेही दुर्लक्ष
तीन-चारवेळा पाण्याच्या टाकीची मागणी केली, इतर सुविधांबद्दलही तक्रार केली आहे. पण, दुर्लक्ष केले जाते. आता खालशांमध्ये साधूंची संख्याही वाढली आहे. अन्नछत्रात प्रसाद घ्यायला येणारेही वाढले. मात्र, काेणतीही सुरक्षा नाही. साधुग्राममधील चोरीच्या घटनांमुळे रात्र जागून काढावी लागते. प्रश्नांकडे लक्ष दिले नाही, तर आमचा डेरा आम्ही उचलणार आहोत. -महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री मनोहरदास महाराज