आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांसाठी घंटागाडी ठेक्याचा घाट, अवास्तव नोंदी, तपासणीच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिडकोतनऊवर्षीय बालिकेच्या मृत्यूला नादुरुस्त घंटागाड्याच जबाबदार असल्याचा नगरसेवकांचा सूर बघून आता ‘संकट हीच संधी’ मानत महापालिकेच्या आरोग्य विभागाने दहा वर्षांसाठी घंटागाडी ठेका देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुळात यापूर्वी महासभेने हा प्रस्ताव फेटाळला असताना आता ठेकेदाराच्या स्वत:च्या गाड्या असतील, तर निमूटपणे देखभाल करतील, अशाही युक्तिवादाची शक्यता आहे.
सिडकोत नेहा ठाकरेचा गुरुवारी घंटागाडीखाली येऊन मृत्यू झाल्यानंतर स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासनाबरोबरच ठेकेदारालाही लक्ष्य केले. पालिकेच्या घंटागाड्यांची नियमित देखभाल होत नसल्यामुळे बिघाड वा अपघात होत असल्याचा सूर व्यक्त झाला होता. नेमकी हीच बाब हेरून आता दहा वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका देण्याच्या हालचाली एकदा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी महासभेने हा प्रस्ताव फेटाळत तीन वर्षांच्या ठेक्याचा निर्णय घेतला होतो. मोठ्या कालावधीसाठी ठेका दिल्यास ठेकेदारावर कारवाई करणे अवघड जात, नियंत्रण रहात नाही, अशी कारणेही दिली होती.

दरम्यान, सिडकोतील घटनेनंतर आरोग्य विभागाकडून दहा वर्षांसाठी निविदा प्रक्रिया करण्याच्या हालचाली सुरू असून, तसा प्रस्ताव आयुक्तांना देणार असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनीच स्थायीच्या घंटागाडी तपासणी दौऱ्याप्रसंगी सांगितले.

खरेदी, ठेकेदारीत रस
वॉर्डनिहाय घंटागाड्यांचा प्रस्ताव पुन्हा मंजूर करण्यासाठी मनसे राष्ट्रवादीतील नगरसेवक अाग्रह धरणार असल्याचेही वृत्त आहे. तसे झाले, तर महापालिकेचा खर्च कमी होऊन निव्वळ कचऱ्याच्या वजनाप्रमाणे पैसे देण्याचेच काम उरेल. काेणत्याही एका ठेकेदाराची मक्तेदारी निर्माण हाेणार नाही प्रसंगी वॉर्डनिहाय मान्य नसेल, तर मात्र विभागनिहाय घंटागाड्यांचे एकाला एकच या तत्त्वाप्रमाणे काम देण्याचा प्रस्तावही पुढे येण्याची शक्यता आहे.

४५ घंटागाड्या बंदच
महापालिकेच्या१७०हून अधिक घंटागाड्या असून, त्यापैकी १२७ गाड्याच सुरू असल्याची माहिती आरोग्याधिकाऱ्यांनी दिली. जवळपास ४५ घंटागाड्या बंद असल्यामुळे कचरा संकलनात अडचणी येत असल्याचेही त्यांनी मान्य केले.

‘आवक-जावक’चाही घोळ
घंटागाडीतूनखत प्रकल्पात येणाऱ्या कचऱ्याला वजनाप्रमाणे पैसे दिले जातात. प्रत्यक्षात येथे येणाऱ्या घंटागाड्या, कचऱ्याची नों यावरच सदस्यांनी बोट ठेवले. सकाळी वाजता आलेली गाडी दुसऱ्यांदा कचरा टाकण्यासाठी १२ वाजता हजर दिसली. घंटागाडीला साध्या कॉलनीतही एक तास लागतो. मग ही नोंद कशी, अशी शंका सदस्यांनी उपस्थित केली. विशेष म्हणजे, कन्नमवार पुलालगतच्या पार्किंगवर कचऱ्याने भरलेल्या घंटागाड्या लावून दिल्याचेही दिसले. कचरा संकलन केल्यानंतर खत प्रकल्पात खाली करता येथे गाड्या उभ्या ठेवण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित करून, वजन केल्यानंतर या कचऱ्याने भरलेल्या गाड्या दुसऱ्या खेपेसाठी परत अाणल्याचा संशयही व्यक्त झाला.

सध्या १७०हून अधिक घंटागाड्या शहरात असून, वाढती लोकसंख्या कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता २०० घंटागाड्यांची गरज आहे. पालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता या गाड्या सरळ खरेदी करण्याचा मोह टाळला जात आहे. मात्र, त्याऐेवजी दहा वर्षांसाठी कंत्राट देऊन ठेकेदाराला अधिक गाड्या खरेदी करता येतील त्यांचा प्रदीर्घ कालावधीसाठी वापर करण्याची हमी दिली, तरच तो ठेका घेण्यासाठी राजी होईल, अशी कारणे देऊन पुन्हा समर्थन केले जात आहे.