आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेचे १४० विद्यार्थी एकाचवेळी सोडणार शाळा,पालक घेणार दाखले परत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जुने नाशिकमधील बडी दर्गाहच्या महापालिका उर्दू शाळेत पाच वर्गांसाठी दोनच शिक्षक असल्यामुळे या शाळेत शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी महापालिकेच्या प्रशासनाकडे वारंवार करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने तेथील १४० विद्यार्थ्यांचे दाखले सामूहिकरीत्या काढण्याचा निर्णय पालकांनी घेतला अाहे. गुरुवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता सर्वच विद्यार्थ्यांचे एकाच वेळी दाखले काढण्यात येणार आहेत.

महापालिका प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे शहरातील अनेक उर्दू शाळा शिक्षकांअभावी बंद होण्याच्या मार्गावर अाहेत. महापालिकेतर्फे अल्पसंख्याक समाजासाठी सुरू करण्यात आलेल्या या उर्दू शाळांमध्ये दहा वर्षांपासून फक्त दोनच शिक्षक पाच वर्ग सांभाळत असल्याने येथील विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मुख्याध्यापकांकडून वारंवार पाठपुरावा केला जात असला, तरी प्रशासनाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाची हीच अनास्था आहे.

महापालिका शिक्षण मंडळाच्या बेफिकिरीमुळे जुने नाशिकमधील बडी दर्गाह उर्दू शाळांमध्ये पुरेसे शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. महापालिकेने उर्दू शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी पालकांकडून वारंवार केली जात असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या शाळेत आठवीच्या दोन वर्गासाठी, तसेच नववी दहावीच्या वर्गांसाठी फक्त दोनच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच, खासगी शाळा आणि महापालिकेच्या शाळांमध्ये मोठा फरक जाणवत असल्यामुळे या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे दाखले एकाच वेळी दाखल काढण्याचे ठरविले आहे. गुरुवारी महापालिका प्रशासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर सकाळी ११ वाजता दाखले काढण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता असलम बशीर खान यांनी दिली.

शिक्षक नेमणुकीसंदर्भात कार्यवाही सुरू...
पालिकेच्या उर्दूशाळेत शिक्षकांची समस्या आहेच. वडाळातील उर्दू शाळेतही चार जागा रिक्त आहेत. बडी दर्गाह उर्दू शाळेच्या शिक्षकांसंदर्भात एकाही पालकाकडून अद्याप माझ्याकडे मागणी आलेली नाही. पालक, शाळा व्यवस्थापन समितीने मागणी केल्यास कारवाई करू. - संजय चव्हाण, सभापती, शिक्षण मंडळ

तर शाळेत जाऊनही काय उपयोग..
माझी दोन मुलं महापालिकेच्या बडी दर्गाह शाळेत जातात. एक आठवीत आणि आणि एक नववीत. आठवड्यातून दोन दिवसच शिक्षक वर्गात असतात. अशी अवस्था असेल तर शाळेत पाठवूनही काय उपयोग. म्हणून गुरुवारी या दोघांचे दाखले काढून घेणार आहे. -अन्वर शेख, पालक
बातम्या आणखी आहेत...