आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय पक्षांच्या फलकांवर संक्रांत, पक्ष हाेणार अाक्रमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अनधिकृत हाेर्डिंग्जविराेधात उच्च न्यायालयाच्या अादेशानुसार उघडलेल्या माेहिमेचाच भाग म्हणून अाता रस्त्यांलगत दाटीवाटीने उभ्या असलेल्या राजकीय पक्षांच्या शाखा तसेच लाेकप्रबाेधन वा चळवळीचा भाग म्हणून उभ्या केलेल्या काळ्या फळ्यांवर संक्रांत येणार अाहे. महापालिकेने राजकीय पक्षांना याबाबत अादेश देऊन असे फलक काढून घेण्याचे अादेश दिले अाहेत. विशेष म्हणजे, महापालिकेच्या ताेंडावर असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे शाखाफलक लावण्याचा धडाका सुरू असतानाच, पालिकेने िदलेल्या अादेशाविराेधात राजकीय पक्षांनी दंड थाेपटण्याची तयारी सुरू केली अाहे.

अनधिकृत हाेर्डिंग्जविराेधात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, न्यायालयाने राज्यातील ११ महापालिकांना २६ जानेवारीपर्यंत शहर हाेर्डिंगमुक्त करावे, अशी नाेटीस बजावून अल्टिमेटम िदला अाहे. परिणामी, पालिकेने अनधिकृत हाेर्डिंग्जविराेधात माेहीम हाती घेतली असून, सात जणांविराेधात गुन्हे दाखल केले अाहेत. २६ जानेवारीनंतर अनधिकृत हाेर्डिंग िदसल्यास न्यायालयाचा अवमान केला म्हणून विभागीय अधिकाऱ्यांवरच कारवाई हाेणार असल्याने पालिकेने हे अादेश गांभीर्याने घेतले अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून राजकीय पक्षांना अनधिकृत हाेर्डिंग लावू नये असे पत्र दिले असून, त्यात हाेर्डिंगबराेबरच बॅनर, पाेस्टर, फलकांना मनाई केली अाहे. पालिकेच्या जागेतील प्रत्येक फलक काढला जाणार अाहे. परिणामी, या अादेशाने लाेकचळवळीचे माध्यम ठरणाऱ्या फळ्यांवरही संक्रांत येणार अाहे. दरम्यान, या अादेशाविराेधात राजकीय पक्षांनी अाक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केल्याचे समजते. शिवसेना गटनेते अजय बाेरस्ते यांनी नगरसेवकांच्या बैठकीत शाखाफलकांबाबत काय करायचे, याबाबत चर्चा केल्याचे सांगितले जाते.

गल्लीबाेळातील माहितीफलकही हटवणार
राजकीयपक्षांनी लाेखंडी खांबांवर उभारलेल्या शाखांचे बाेर्ड, रस्त्यालगत पक्षचिन्हांसह कार्यकर्त्यांची नावे असलेली बांधकामे यांनाही फलक म्हणून गृहीत धरल्याने पालिकेचे गटनेते तसेच महानगरप्रमुखांना फाेन करून अधिकारी अाता अशा शाखाही हटवण्याचे अावाहन करीत अाहेत. तसेच, गल्लीबाेळातील माहिती देण्यासाठी लावलेले काळे फलकही काढले जाणार अाहेत.