आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर अाॅक्टाेबरपासून व्यावसायिकांवर धडक कारवाई, अाठ वर्षांचा कर व्याज दंडासह हाेणार वसूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- व्यावसायिकांनी ३० सप्टेंबर २०१६ व्यवसाय कर कायदा याअंतर्गत नोंदणी केल्यास पाच वर्षांचा व्यवसाय कर माफ करण्यासाठी शासनाने अभय योजना-२०१६ जाहीर केली आहे. तर, व्यवसाय कर बुडविणाऱ्यांविरुद्ध आॅक्टोबरपासून धडक कारवाई करत अाठ वर्षांचा व्यवसाय कर दंड व्याजासह वसूल केला जाईल.
उपजीविका भागविण्यासाठी कोणतेही छोटे-मोठे व्यवसाय करणारे सर्वच व्यावसायिक महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका नोकऱ्या यावरील कर अधिनियम १९७५ या कायद्यान्वये नाव नोंदणीसाठी पात्र आहेत. व्यवसाय नोंदणी नसल्याने हा कर कोठे कसा भरला जातो हे माहीत नसल्याने अनेक जण व्यवसायकर नोंदणी प्रमाणपत्र घेत नाहीत. त्याचबरोबर डाॅक्टर, वकील, सीए, बांधकाम व्यावसायिक, बिल्डिंग मटेरियल सप्लायर, पीडब्ल्यडी काॅन्ट्रॅक्टर, विमा एजंट, कमिशन एजंट, किराणा दुकान, इतर मुंबई दुकाने आस्थापना अधिनियम- १९४८ अंतर्गत नोंदणीकृत व्यापारी इतर व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील लोकांनी व्यवसाय कर भरणे आवश्यक आहे. परंतु, यातील अनेक जण हा कर भरत नसल्याचे लक्षात आल्याने विक्रीकर विभाग, नाशिक यांनी सुमारे १० हजार ‘साैजन्यपत्र’ व्यापारी व्यावसायिकांना दिले. अशा नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे.

हा आहे ‘अभय’ योजनेचा फायदा
अनेकवर्षांपासून थकलेला व्यवसाय कर वसूल करण्यासाठी शासनाने व्यवसाय कर अभय योजना- २०१६ जाहीर केली आहे. सक्तीची कारवाई करण्यापूर्वी करदात्यांना फायदा होईल अशी ही योजना आहे. यात सहभागी होणाऱ्या व्यावसायिकांना वर्षांपैकी वर्षांचा कर तसेच करावरील व्याज दंडाची संपूर्ण माफी मिळून केवळ तीन वर्षांचा निव्वळ कर भरावा लागेल.

व्यवसाय करासाठी पात्र असलेल्यांना झटका
विक्रीकरविभाग, नाशिक यांच्याकडे व्हॅट नोंदणी केलेल्या व्यावसायिकांपैकी काही व्यावयायिकांनी प्रोफेशनल टॅक्स इनराॅलमेंट सर्टिफिकेट नंबर (पीटीईसी) अद्यापही घेतलेले नाही. या व्यावयायिकांना विक्रीकर विभागाने साैजन्यपत्र पाठवून अभय योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शासकीय किंवा खासगी नोकरी करून उपजीविका भागवणाऱ्या मासिक वेतनातून प्रोफेशनल टॅक्स (व्यवसाय कर) कपात केला जातो. परंतु, उपजीविकेसाठी स्वत:चा व्यवसाय, उद्योग करणारे इतर लोक हा कर भरत नाहीत. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका नोकऱ्या यावरील कर अधिनियम १९७५ (व्यवसाय कर) कायद्यानुसार हा कर भरणे आवश्यक आहे. म्हणून इतर घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी शासनाने यावर भर दिला आहे. यासाठी व्यवसाय कर अभय योजना-२०१६ सुरू करण्यात आली आहे.

व्यवसाय कर बुडविणाऱ्यांवर करडी नजर
विविध विभागांच्या वतीने आवाहन
अभय योजना २०१६ मध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर, सहकार विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, चार्टर्ड अकौंटंट्स, कर सल्लागार संघटना यांच्यासह अनेक व्यापारी व्यावसायिकांच्या संघटनांसाेबत पत्रव्यवहार करून नोंदणी प्रमाणपत्र घेण्याबाबत आवाहन केले आहे. योजनेत ३० सप्टेंबरपूर्वी नोंदणी केल्यास करदात्यांना फायदा होईल. -डॉ. विकास डावरे, सहायक विक्रीकर आयुक्त (स्वीय सहायक), नाशिक क्षेत्र
PTEC साठी आवश्यक माहिती

पॅनक्रमांक, संपूर्ण पत्ता, बँक खाते क्रमांकाचा तपशील IFSC कोड, इ-मेल आयडी, मोबाइल क्रमांक PTEC साठी ३० सप्टेंबर २०१६ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

आॅनलाइन करता येतो अर्ज
व्यवसायाचेस्वरूप ठिकाणावरून ५०० रुपये ते २५०० रुपयांपर्यंत दरवर्षी हा कर आकारला जातो. विक्रीकर विभागाच्या www.mahavat.gov.in या संकेतस्थळावर इ-सर्व्हिसेसमध्ये ptec eregistration मध्ये ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज केल्यावर तीन दिवसांत आपल्याला PTEC नंबर प्राप्त होतो. नंबर मिळाल्यावर या नंबरच्या साहाय्याने विक्रीकर विभागाच्या www.mahavat.gov.in या संकेतस्थळावर E-Services मध्ये जाऊन EPayment यावर क्लिक करून thrugras ptec पर्यायावर क्लिक करावे आॅनलाइन पेमेंट करावे.
बातम्या आणखी आहेत...