आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्नपत्रिका बदलावरून संभ्रम, इयत्ता नववीच्या प्रश्नपत्रिकेतील बदल फक्त प्रथम भाषेपुरताच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- घाेकमपट्टी करून केवळ लेखन काैशल्याच्या अाधारे गुण मिळविण्याएेवजी विद्यार्थ्यांची अाकलन क्षमता वाढावी म्हणून राज्य शिक्षण मंडळाने नववीच्या प्रथम भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या वर्षापासून बदलले खरे. मात्र, संबंधित अादेश नीट समजूनच घेतल्याने प्रथम भाषेबराेबर अन्य विषयांच्याही प्रश्नपत्रिकेत बदल करण्याचे धाेरण काही शाळांनी अवलंबिले अाहे. त्यामुळे वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांचा गाेंधळ हाेण्याची शक्यता अाहे.

इयत्ता नववीच्या प्रथम भाषा परीक्षा पद्धतीत महत्त्वाचा बदल करण्यात अाला अाहे. त्यात प्रथम भाषेचा पेपर अाकलन क्षमतेची तपासणी करणारा असेल. यापूर्वी प्रश्नाेत्तर स्वरूपात ही परीक्षा व्हायची. अाता मात्र प्रथम भाषेचा पेपर ‘उताऱ्यावरून प्रश्न’ तसेच वाक्यावरून प्रश्न या अाधारावर असेल. त्यातील बहुतांश प्रश्न पाठ्यक्रमातील धड्यांमधील असतील. तर काही प्रश्न अन्य पुस्तकातील असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित परिच्छेद किंवा उतारा समजून घेऊन उत्तरे लिहावी लागणार अाहेत. याविषयीचे प्रशिक्षण माध्यमिक शिक्षकांना देण्यातही अाले अाहे. परंतु प्रथम भाषेबराेबर अन्य भाषांचीही प्रश्नपत्रिका बदलण्यात येणार असल्याचा गैरसमज काही शाळांमध्ये झाला अाहे.

कृत्रिपत्रिकामुळे घोळ
वीच्याप्रथम भाषेचा अभ्यासक्रम बदलता प्रश्नपत्रिका बदलल्यामुळे ‘कृतिपत्रिका’ अशी संकल्पना वापरल्यामुळे इयत्ता नववीला मराठी शिकविणारे शिक्षक गोंधळले आहेत.

दहावीत पुढच्या वर्षी
चालूशैक्षणिक वर्षात इयत्ता नववीसाठी प्रथम भाषा संस्कृतसाठी कृतिपत्रिका असणार अाहे. तर पुढील वर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेत राज्यभर अशाच प्रकार कृत्रिपत्रिका पद्धत सुरू होणार आहे.