आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिग्नल लावा, अन्यथा सेना स्टाइल आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- सिटीसेंटर मॉल, उंटवाडीरोड येथील चौफुलीवरील सिग्नल यंत्रणा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी युवासेनेने केली असून, दोन दिवसांत सिग्नल सुरू झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अनेक दिवसांपासून या भागात कोंडी होत असून, पुढे जाण्याच्या नादात कित्येकांनी जीव गमावला असून, छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहे. प्रशासनाकडे सर्व यंत्रणा असताना केवळ कार्यान्वित करण्यासाठी वेळकाढूपणा होत आहे. याच ठिकाणी फळविक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केले आहे. त्यामुळे कोंडीत भर पडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

सुटीच्यादिवशी मॉलची रस्त्यावर पार्किंग : शनिवार,रविवार सुटीच्या दिवशी सिटी सेंटर मॉलची पार्किंग या संपूर्ण रस्त्यावर केली जाते. त्यामुळे कोंडी होते. सिटी सेंटर मॉलमधील ग्राहकांची संख्या लक्षात घेता येथे पार्किंग समस्या निर्माण झाली असून, त्यातून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

सतत पाठपुरावा
याठिकाणी आम्ही सिग्नल यंत्रणा होण्यासाठी सतत पाठपुरावा केला. आता सिग्नल कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. दोन दिवसांत सिग्नल सुरू करावा, अन्यथा शिवसेना स्टाइल आंदोलन करू. पवन मटाले, महानगरप्रमुख, युवासेना

सिग्नल यंत्रणेचे किरकोळ काम बाकी आहे. खांबाला विद्युत पुरवठा देण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांत हे काम करून प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तत्काळ हे काम केले जाईल. एस. पी. बनकर, कार्यकारी अभियंता, महापालिका

अतिक्रमणाला जबाबदार कोण?
सुरुवातीलाया रस्त्यावर एक-दोन फळविक्रेते हातगाडे लावत. सध्या १५० विक्रेत्यानी येथे ठाण मांडले असून ग्राहक रस्त्यात वाहने उभी करत असल्याने कोंडी वाढते. या विक्रेत्यांकडून पालिका पावती फाडत असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाला हप्ते देत असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. पालिकेचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप हाेत आहे.

सिटी सेंटर मॉल येथील चौफुलीवरील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो आहे.