आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचे उद्याेजक देणार वीजदर निर्णयाला अाव्हान, दुभाजाव केल्याचा परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- उद्याेगांना वीज दरात सवलतीचा निर्णय घेताना राज्य सरकारने विदर्भ-मराठवाड्याच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्राला अत्यल्प सवलत दिली अाहे. त्यामुळे नाशिकमधील स्टील उद्याेग प्रभावित हाेणार असून हजाराे राेजगार धाेक्यात येणार असल्याच्या भावना उत्तर महाराष्ट्रातील विशेषत: नाशिककर उद्याेजकांतून व्यक्त हाेत अाहेत. शासनाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात अाव्हान देण्याची तयारीही त्यांनी केली अाहे.

सत्तेत अाल्यावर भाजप सरकारने विदर्भ मराठवाड्यातील उद्याेगांना सवलतीच्या दरात वीज देण्याचे मनसुबे िदसू लागल्यावर नाशिकसह नगर उर्वरित महाराष्ट्रातील अाैद्याेगिक संघटनांनी घेतलेली अाक्रमक भूमिका, लाेकांचा वाढता दबाव यामुळे उपसमितीच्या गठणापर्यंत हे प्रकरण गेले उत्तर महाराष्ट्राचा समावेश या सवलतीच्या पॅकेजमध्ये करावा लागला. मात्र, सरकारने केवळ स्टील उद्याेग डाेळ्यासमाेर ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा अाराेप करण्यात येत असून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर अाणि दिंडाेरी येथे असलेले उद्याेग अडचणीत येणार अाहेत, तर जालन्यातील स्टील उद्याेगांना याचा थेट फायदा हाेणार अाहे. यामुळे नाशिकमधील उद्याेग बंद पडण्याची शक्यता बळावली अाहे. यामुळे या उद्याेगांतील कामगार, उद्याेगांवर अवलंबून असलेले विविध राेजगार अशा स्वरूपातील जवळपास दहा हजारांवर राेजगार धाेक्यात येणार असल्याने संताप व्यक्त हाेत अाहे.

बैठकीतठरणार पुढील दिशा :निमा हाऊस येथे एक जुलै राेजी वीज ग्राहक संघटनेची वीज नियामक अायाेगाच्या पुढील महिन्यात हाेऊ घातलेल्या सुनावणीबाबत बैठक हाेत अाहे. यातच उद्याेगांना वीजदर सवलतीच्या विषयावर चर्चा हाेणार अाहे.

विपरीत परीणाम
अविकसितप्रदेशाच्याविकासासाठी ही याेजना त्यात उत्तर महाराष्ट्राचा समावेश केला ही बाब चांगली अाहे. केंद्रीय विद्युत मंत्री म्हणतात की, देशात एकच वीजदर महाराष्ट्रस्तरावर लगेच गुंतवणूक अाणायची असेल त्या प्रक्रियेत नाशिक विभागाला उद्याेग कमी प्रतिसाद देतील. मिलिंदराजपूत, चेअरमन, ऊर्जा समिती, निमा

ताेंडाला पाने पुसली
यासवलत याेजनेत उत्तर महाराष्ट्राचा समावेश करण्याच्या प्रयत्नांना काही अंशी यश अालेे. मात्र, सरकारने अाैद्याेगिक ग्राहकांना अल्पशी सवलत दिली तर एक्स्प्रेस फीडर उच्चदाब ग्राहकांच्या ताेंडाला पाने पुसली अाहेत. विदर्भ मराठवाड्याच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्राला दिलेली सवलत केवळ नावापुरती अाहे. लघु उद्याेजकांना मात्र थाेडाफार दिलासा दिला अाहे. मंगेशपाटणकर, सरचिटणीस, निमा
बातम्या आणखी आहेत...