आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुल्कप्रश्नी प्राचार्यांच्या सभेत गोंधळ, छात्रभारतीच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध, घोषणाबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुलींना मोफत शिक्षणाची शासन याेजना असताना शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांकडून बेकायदेशीरपणे घेण्यात आलेले शुल्क परत करणाऱ्या महाविद्यालयांवर मान्यता रद्दची कारवाई करावी, या मागणीसाठी छात्रभारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी शनिवारी प्राचार्यांच्या बैठकीत गोंधळ घातला.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्राचार्यांचा निषेध करून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर तीव्र रोष व्यक्त करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरच ठिय्या देत घोषणाबाजी केली. अखेर या प्रकरणी शिक्षण उपसंचालकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शुल्क परत करणाऱ्या महाविद्यालयांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचे आश्वासन घेतल्यानंतरच या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठ सोडले. बैठकीत वारंवार गोंधळ झाल्याने अखेर पोलिसांनी सभागृह गाठत आंदोलनकर्त्यांची समजूत काढत त्यांना बाहेर काढले.

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ यासाठीच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अायाेजित रावसाहेब थोरात सभागृहात प्राचार्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शिक्षण सहाय्यक संचालक दिलीप गोविंद, शिक्षण उपनिरीक्षक के. डी. मोरे, ए. बी. बागुल यांच्यासह जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य प्रतिनिधी सहभागी झाले होते. दिलीप गोविंद हे अकरावी प्रवेशाबाबतच्या कार्यप्रणालीची माहिती उपस्थितांना देत असतानाच अचानक छात्रभारती संघटनेच्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर जाऊन गोंधळ घातला. यावेळी प्राचार्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत बेकायदेशीरपणे घेतलेले शुल्क परत करण्याची मागणी केली.

या वेळी शिक्षण विभागातर्फे दिलीप गोविंद यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरच ठिय्या दिला. तब्बल दीड ते दोन तास आंदोलन केल्याने सभेत वारंवार अडथळे आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांवर मान्यता रद्दची कारवाई करण्याची मागणी करत छात्रभारतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकच गोंधळ घातला. अखेर सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी समजूत काढल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी व्यासपीठ सोडले.

१५जूननंतर अकरावीचे प्रवेश : गुणपत्रकमिळाल्यानंतर १५ जूननंतर अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा असलेली शहरात ५० हून अधिक महाविद्यालये असून, त्यात २० हजारांवर जागा उपलब्ध आहेत. तर, नाशिक जिल्ह्यात एकूण ३२८ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात तब्बल ६५ हजार २८० जागा आहेत.

कारवाई करण्यास चालढकल
^नियमधाब्यावरबसवून मुलींकडून शुल्क घेतल्याच्या तक्रारी करूनही शिक्षण विभागाकडून काहीही कारवाई केली जात नाही. यानंतरही जर कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याने नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. -शरद कोकाटे, छात्रभारतीसंघटना

मान्यता रद्दचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू
^बेकायदेशीरपणेशुल्कघेतलेल्या १७ महाविद्यालयांना नोटीस बजावली असून, त्यातील काहींवर वेतनेत्तर अनुदान कपात केले. तर, ज्या महाविद्यालयांनी शुल्क परत केलेले नाही, त्यांची चौकशी समितीतर्फे माहिती घेतली जाईल. तसेच त्यांच्या मान्यता रद्दचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला जाईल. - दिलीप गोविंद, शिक्षणसहाय्यक संचालक
पुढाल स्लाइड्सवर जाणून घ्या, असे होतील प्रवेश...
बातम्या आणखी आहेत...