आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राला शेतकरी अात्महत्यांचे ग्रहण, निफाड तालुक्यात पाच महिन्यांत १३ अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शेतीतील सधनतेच्या निकषांवर राज्याचा कॅलिफाेर्निया म्हणून अाेळख असलेल्या निफाड तालुक्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल १३ शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्याची दुर्दैवी बाब पुढे अाली अाहे. दुष्काळ अाणि नापिकीमुळे मराठवाडा अाणि विदर्भातच अात्महत्या हाेतात हा समज या जिल्ह्यात घडलेल्या काही घटनांनी खाेडून काढला अाहे. द्राक्ष, डाळिंब अाणि कांदा आदी पिकांमुळे सधनतेच्या यादीत वरच्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत ५० शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या अाहेत.
द्राक्ष, डाळिंबाच्या उत्पादनात निफाड तालुक्याला महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया मानले जाते. द्राक्षपंढरी अाणि सधन, समृद्ध तालुका म्हणूनदेखील निफाडची अाेळख अाहे. द्राक्ष अाणि कांदा यांसारखी नगदी पिके या तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात घेतली जातात. द्राक्षाचे एकरी उत्पन्न ते १० लाख, तर कांद्याचे एकरी उत्पन्न दीड लाखाच्या अासपास असले तरी कायमच असलेल्या अनिश्चित दरांमुळे उत्पन्न खात्रीशीर नसते. नगदी पिकांमुळे निफाड तालुक्याचे दरडाेई उत्पन्नही तुलनेने इतर तालुक्यांपेक्षा जास्त अाहे. नाशिकचे दरडाेई उत्पन्न लाख हजार रुपये असून निफाडचे उत्पन्न यापेक्षा २५ टक्के अधिक अाहे. येथील शेतकरी उत्पन्न अधिक असले तरी कर्जही अधिक घेतात, असे बँकर्सचे म्हणणे अाहे. या कर्जाची परतफेड करता अाल्याने अनेकांनी अात्महत्येचा मार्ग स्वीकारला अाहे.

अात्महत्यानक्की कशाने वाढल्या? :
गेल्यातीन वर्षांपासून मान्सूनचे बिघडलेले चक्र, उशिराने पडणारा पाऊस, कधी दुष्काळ, तर कधी गारपीट यामुळे अालेली नापिकी, परिणामी बँकांची कर्ज परतफेड करण्याचे निर्माण हाेणारे अाव्हान यामुळे नैराश्येतून शेतकरी अात्महत्या करत असल्याचे बहुतांश प्रकरणातून समाेर अाले अाहे. गतवर्षभरात ८४ शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या हाेत्या, यंदा मात्र जून महिन्याच्या मध्यातच ही संख्या ५० वर पाेहाेचली अाहे. यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली अाहे. अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्षही स्थापन करण्यात अालेला अाहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांनी ‘अात्महत्येचा विचार जरी मनात अाला, तरी अामच्याशी चर्चा करा, तुमच्या अडचणी सांगा, तुमचे प्रश्न नक्की साेडवण्याचा प्रयत्न करू,’ असे अावाहन करूनदेखील अात्महत्या थांबलेल्या नाहीत.

भांडवली खर्चही वसूल झाल्याने अात्महत्या
मुळात नगदीपिके या तालुक्यात माेठ्या प्रमाणावर घेतली जातात अाणि नगदी पिकांना भांडवलही जास्त लागते. सातत्याने अालेल्या गारपीट, दुष्काळ यासारख्या संकटांमुळे पीक हातातून जाते. भांडवली खर्चही वसूल झाल्यास कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्न सातत्याने भेडसावताे कर्जफेडीची क्षमता संपली की नैराश्यातून शेवटी शेतकरी अात्महत्येपर्यंत पाेहाेचताे. डाॅ.गिरधर पाटील, कृषी अर्थतज्ज्ञ

तरुण शेतकरीच जास्त
नाशिकजिल्ह्यात अात्महत्या करणाऱ्यांत २१ ते ३५ वयाेगटातील २२ तरुण शेतकऱ्यांचा समावेश अाहे. सन २०१४ या संपूर्ण वर्षात ४३ शेतकऱ्यांनी, तर २०१५ मध्ये ८५ शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या हाेत्या.

जिल्ह्यात या महिन्यात अशा झाल्या अात्महत्या : जानेवारी-०३, फेब्रुवारी - ०५, मार्च - १०, एप्रिल - ५, मे - १८. यापैकी २१ अात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुुटुंबीय सरकारी मदतीसाठी पात्र ठरली अाहेत, तर १८ प्रकरणे अद्यापही प्रलंबित अाहेत. ११ अपात्र ठरली अाहेत.
बातम्या आणखी आहेत...