आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीडीअार धाेरणाविराेधात प्रसंगी रस्त्यावरही उतरणार, नाशिककरांचा निर्धार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यशासनाने अाणलेल्या नव्या टीडीअार धाेरणाविराेधात प्रथम मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नाशिककरांवर झालेला अन्याय मांडण्यात येणार असून, उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिकाही दाखल करण्यासह वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार नाशिककरांनी साेमवारी केला. हा लढा लढण्यासाठी ‘स्थापत्य महासंघ’ची स्थापना करण्यात अाली अाहे. दरम्यान, सरकारचे टीडीअार धाेरण अन्यायी असून, त्याविराेधात अातापर्यंत नऊ जनहितार्थ याचिका न्यायालयात दाखल झाल्या असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात अाले.
राज्य सरकारने अाणलेल्या नव्या टीडीअार धाेरणातील अन्यायी तरतुदींना विराेध दर्शविण्यासाठी वैराज कलादालन येथे साेमवारी एका विशेष बैठकीचे अायाेजन करण्यात अाले हाेते, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारावर अार्किटेक्ट, इंजिनिअर्स, कन्सल्टंट, स्ट्रक्चरल डिझायनर्स, पुरवठादार, बांधकाम व्यावसायिक, या क्षेत्रातील तज्ज्ञ, नगरसेवक उपस्थित हाेते.

बैठकीला असाेसिएशन अाॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स नाशिक शाखेचे चेअरमन विजय सानप यांनी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम या टीडीअार धाेरणाची अधिसूचना अाली, त्याला विराेध म्हणून २०१५ मध्ये रास्ता राेकाे केल्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या अकरा जणांचे अभिनंदन सानप यांनी केले. टीडीअार धाेरण शहरविकासाला कसे मारक अाहे, याचे सादरीकरणच सानप यांनी अाकडेवारीसह उपस्थितांसमाेर मांडले. ‘कपाट’ त्यानंतर एफएसअायचा गैरवापर हरित लवादाचा निर्णय यामुळे संबंध बांधकाम व्यवसायालाच गेल्या वर्षी जानेवारीपासून घरघर लागली असून, त्याच्या झळा नाशिककरांना साेसाव्या लागत अाहेत. बांधकाम व्यवसाय ठप्प असून, राेजगाराचा प्रश्न गंभीर बनला अाहे, यातूनच सामाजिक समस्याही उद््भवणार असल्याकडे सानप यांनी लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हृषिकेश पवार यांनी केले. बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ अविनाश शिराेडे, अभय साखरे, अार्किटेक्ट असाेसिएशनचे चेअरमन प्रदीप काळे, अार्किटेक्ट इंजिनिअर्स असाेसिएशनचे अध्यक्ष अार.के.सिंग, बिल्डर्स असाेसिएशन अाॅफ इंडियाचे अध्यक्ष रामेश्वर मालाणी, इंडीयन इन्स्टीट्युट अाॅफ इंटेरीयर डिझायनर्सचे अध्यक्ष हेमंत दुग्गड, हेमंत धात्रक, नगरसेवक उध्दव िनमसे अादी हाेते.
पैसेदेऊन सगळ्या गाेष्टी विकत घेता येत नाहीत : चुकीचीकामे केली तरी पैसे देवून ती िमटविता येतात, हा भ्रम हे धाेरण अाल्याने अनेकांना उमगले असून काेणत्याही चुकीच्या कामाचे समर्थन करता येणार नाही. अशा काेणत्याही कामात कधीच सहभागी हाेवू नये असे अावाहनही सानप यांनी यावेळी केले.

लाेकप्रतिनिधीतूमच्या साेबत :
नाशिककरांच्याभावना ह्याच अामच्याही भावना अाहेत त्यामुळे भाजपाचे सगळे लाेकप्रतिनिधी जनतेच्या साेबतच अाहेत. टीडीअार धाेरणाचा गंभीर प्रश्नी त्यांनासाेबत घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जावू इतकेच नाही तर वेळप्रसंगी शहरवासियांसमवेत अाम्हीही रस्त्यावर उतरू असे भाजपाचे नेते क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांना भेटून देणार माहिती
स्थापत्य महासंघ स्थापन
हालढा लढण्यासाठी स्थापत्य महासंघाची स्थापना करण्यात अाली असून, नाशिककरांना पाचशे रुपये भरून सहभागी हाेता येणार अाहे. न्यायालयीन लढ्यात प्रत्येकाचा सहभाग असावा, याकरिता पाचशे रुपये भरून संघाचे सभासद हाेता येणार अाहे. कार्यक्रमस्थळीच २३४ जणांनी या संघात सहभाग नोंदविला.

न्यायालयात अाव्हान देऊ
नवेटीडीअार धाेरण शहराच्या विकासाला मारक असून, महापालिकेचा अार्थिक कणा माेडणारे अाहे. टीडीअार कायद्याची प्रस्तावना जरी वाचली असती तरी असा अध्यादेश सरकारने लागू केला नसता. नाशिककरिता हे नवे टीडीअार धाेरण याेग्य नसून, प्रत्येक शहराची रचना वेगळी असून, त्यानुसार वेगवेगळे धाेरण गरजेेचे अाहे. एकाच प्रकारच्या रस्त्यावर वेगवेगळा टीडीअार या धाेरणात दिला गेला असून, हे घटनाबाह्य अाहे. त्यामुळे न्यायालयात तत्काळ या धाेरणाला स्थगिती मिळेल, याकडे लक्ष वेधतानाच अापण विविध संस्थांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयात या विराेधात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला पाहिजे, असे मत उपमहापाैर गुरुमित बग्गा यांनी यावेळी व्यक्त केले.