आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवर्षी दीड हजार झाडांची कत्तल; वर्षागणिक वाढते शहराचे तापमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पर्यावरण संतुुलित, अाराेग्यदायी जीवन जगण्यासाठी प्रत्येक कुटंुब, कुटुंबांतील प्रत्येक व्यक्तीने शहरात झाडे लावली पाहिजे. शहराच्या भाैगोलिक विस्ताराच्या ३३ टक्के क्षेत्र झाडांसाठी असणे अावश्यक अाहे. जळगाव शहरात मात्र, अनेक वस्त्या, रस्ते झाडाविना बाेडकी झाली अाहेत. रस्त्याने जाताना उभे राहण्यासाठी सावलीसाठीदेखील झाडे नाही. दरवर्षी वृक्षाराेपणाच्या शासकीय साेपस्कारातून लागवड केलेल्या वृक्षांपैकी टक्क्यांपेक्षाही कमी झाडे जगतात तर सरासरी दीड हजार वृक्षांची कत्तल केली जाते. परिणाम दरवर्षी अंशाअंशाने वाढणारे तापमान यावर्षी ४८ अंशांपर्यंत पोहोचले. त्यामुळे जमिनीची धूप थांबवणे, डेरेदार वृक्षांच्या घनदाट छायेने झाकलेले सुंदर जळगाव बनवण्यासाठी प्रत्येकाने वृक्षाराेपण करण्याची वेळ येऊन ठेपली अाहे.

जळगाव जिल्ह्याच्या एकूण भौगाेलिक क्षेत्रापैकी १६.९६ टक्के भाग जंगलाने व्यापला अाहे. त्यातही उजाड वनांचे क्षेत्र अधिक अाहे. तर नागरीभागात झाडांचे प्रमाण नगन्य अाहे. उंच इमारतीच्या स्पर्धेेत सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी मान उंचाऊन कसेबसे उभ्या असलेल्या झाडांचे अस्तित्व जेमतेम अाहे. लाख लाेकसंख्येच्या जळगाव शहराचा विचार केल्यास झाडांची संख्या दीड ते दाेन लाखांपेक्षाही कमी असेल. शहरातील अनेक रस्ते, वस्त्या झाडांविना उजाड अाहेत.
लागवडनव्हे, तर ताेडण्यावर भर : शहरातवृक्षलागवडीपेक्षा वृक्ष ताेडण्यावर अधिक भर अाहेत. काही लाेक महापालिकेकडे फांदी ताेडण्याची परवानगी मागून वृक्षावर घाव घालीत अाहेत. तर काहींनी विनापरवानगीच झाडांची कत्तल करण्याचा धडाका लावला अाहे. दरवर्षी शहरात सरासरी दीड हजार वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे समोर आले आहे.

चौपदरीकरणात२० हजार झाडांची कत्तल :जिल्ह्यात सन २०१३-१४मध्ये नवापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरणाच्या कामासाठी निविदा हाेण्यापूर्वीच तब्बल २० हजार झाडांची कत्तल करण्यात अाली. त्यानंतर महामार्गावर एकही झाड लावण्यात अालेले नाही. त्यामुळे महामार्गावरील अनेक महाकाय वृक्षांवर असलेली जैवविविधता नष्ट पावली. त्याचा फटका शहराला लागून असलेल्या भागातदेखील बसला आहे.

प्रदूषणाचा वाढता विळखा
शहरातमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फेे बीजे मार्केट, एमअायडीसी अाणि काव्यरत्नावली रस्त्यावर गिरणा टाकीजवळ प्रदूषणाचे घटक माेजमाप केले जाते. या विभागाच्या अहवालानुसार जळगाव शहरातील धूलिकणांचे प्रदूषण वाढले अाहे. वायू प्रदूषणाचा विळखा वाढण्यापूर्वीच वृक्षाराेपणाचे नियाेजन करावे लागेल. झाडापासून प्राणवायू उपलब्ध करणे, जमिनीची धूप थांबवणे, जमिनीची सुपिकता व्यवस्थापन करणे, आर्द्रतेवर नियंत्रण ठेवते, पाण्याचे चलनवलन करणे, पशुपक्षी, जैवविविधतेला आश्रय देणे अादी कामे करावी लागणार आहेत. जळगाव जिल्ह्यात मात्र झाडांची स्थिती राज्यातील इतर काेणत्याही लाख लाेकवस्तीच्या शहरापेक्षा वाईट अाहे. नवीन झाडे लावण्याएेवजी अाहे ती झाडे ताेडण्याकडे नागरिकांचा कल अाहे.

प्रतिमिनिट २५० मि.लि.ऑक्सिजन आवश्यक
^प्रत्येकव्यक्तीलादररोज प्रतिमिनिट २५० मि.लि. आॅक्सिजनची आवश्यकता असते. ग्रामीण भागापेक्षा शहरात प्रदूषणाचा निर्देशांक जास्त असल्यामुळे सध्याच्या स्थितीत तेवढा आॅक्सिजन शरीराला उपलब्ध हाेऊ शकत नाही. फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवरही त्याचा परिणाम हाेताे. डाॅ. परीक्षित बाविस्कर, एमडी.

वृक्षताेड थांबवण्याचा प्रयत्न
शहरातीलवृक्षताेड थांबवण्यासाठी अनेक लाेक पुढे येत अाहेत. शहरात वार्षिक सरासरी दीड हजारावर झाडे ताेडली जातात. अनेक जण वृक्षताेड हाेत असल्याचे अाम्हाला फाेन करून कळवतात. अाम्ही वृक्षताेड थांबवण्याचा प्रयत्न करताे. महापालिकेने यात कारवाई करावी, यासाठी पाठपुरावा असताे. वासुदेव वाढे, निसर्गप्रेमी.

प्रदूषणावर झाडे हाच उपाय
^शहरातनागरी भाग, रस्ते अाणि एमअायडीसी भागात वृक्षांची संख्या वाढली पाहिजे. सध्या प्रदूषणाची पातळी कमी असली तरी ती नियंत्रणात ठेवण्यासाठी झाडे हा एकमेव उपाय अाहे. या वर्षी जास्तीत जास्त झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवावे लागणार अाहे. नागरिकांचा त्यात सहभाग असणे अावश्यक अाहे. एम.ए. करे, उपप्रादेशिकअधिकारी, प्रदूषण नियंत्रण

एका व्यक्तीला १५ किलो ऑक्सिजनची गरज
ढाेबळ मनाने एका व्यक्तीला जीवन जगण्यासाठी दरराेज किमान १५ किलाे अाॅक्सिजनची गरज भासते. दिवसभरात मध्यम स्वरुपाची झाडे १५ किलाे अाॅक्सिजन तयार करतात. त्यामुळे शहरात मानसी किमान झाडे असणे अावश्यक अाहे.

जिल्ह्यातील वनक्षेत्राची माहिती
१७९२.४३- चाैरसकिलाेमीटर राखीव वनक्षेत्र
२.४४- चाैरसकिलाेमीटर संरक्षित वनक्षेत्र
१९९४.८७- चाैरसकिलाेमीटर एकूण वनक्षेत्र
१६.९६- टक्केभौगाेलिक क्षेत्राची टक्केवारी
बातम्या आणखी आहेत...