आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरीला महापूर आला होता. गोदावरीचे पाणी कमी झाले असले, तरी दुसरीकडे महापुराने बाधीत झालेल्या गोदाकाठच्या शेकडो रहिवाशांना मोठा फटका बसला आहे. गोदावरीसह पंचवटीतील वाघाडीकाठच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले, तर काही रहिवाशांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू पुरामध्ये वाहून गेल्या. घारपुरे घाट, बुरुडवाडी, संजयनगर या परिसरांमध्ये मोठी घटना घडूनही लोकप्रतिनिधी या भागाकडे फिरकलेही नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महापालिका प्रशासनाने पंचवटीतील बाधीत रहिवाशांच्या सोसायट्या परिसरांची पाहणी करून पुरामुळे बाधीत कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रचंड नुकसान झाले
गोदावरीला आलेल्या महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले. पुराचे पाणी घरात घुसल्याने चिखल साचला. घरातील सर्वच वस्तूंचे नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने आर्थिक मदत करावी. -कमळाबाई मोरे, रहिवासी, घारपुरे घाट

पक्की घरे बांधून द्यावीत
- बुरुडवाडीत अनेक घरांत पुराचे पाणी घुसले होते. घरातील अनेक महत्त्वाच्या वस्तू वाहून गेल्या. घरांचीही पडझड झाल्याने संसारच उद््ध्वस्त झाले. शासनाने नुकसानभरपाई देऊन पक्की घरे बांधून द्यावीत. -दत्ता पाटील, रहिवासी, बुरुडवाडी
बातम्या आणखी आहेत...