आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जनानंतर स्वच्छतेचा पालिकेचा पडला विसर, गोदाकाठ परिसरात निर्माल्य पडून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेश विसर्जनानंतर गोदाकाठ परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य पडून असल्याने ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले अाहे. अशी परिस्थिती असताना या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र विसर पडला आहे. 
 
गणेशमूर्ती निर्माल्य नदीत विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषणात भर पडत असल्याने नागरिकांनी मूर्तीदानासह निर्माल्य महापालिकेकडे जमा करावे, असे आवाहन पालिकेने केले होते. त्यासाठी ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांनी नेमणूक करण्याबरोबरच निर्माल्य कलशही ठेवले होते. असे असतानाही गोदाकाठ परिसरातील गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर पूल तपोवन परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य पडून आहे. निर्माल्य कलशातील निर्माल्य अद्यापपर्यंत संकलित करण्यात आलेले नाही. परिणामी परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होवून दुर्गंधी पसरली आहे. गणेश विसर्जनानंतर दोन दिवस उलटल्यानंतरही स्वच्छता झाली नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिक पर्यटकांना ओंगळवाणे दर्शन घडत आहे. गोदावरी काठ परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे अस्वच्छतेत भर घालणाऱ्या बाबींकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते आहे. वाढत्या तक्रारी लक्षात घेता तातडीने या ठिकाणी तातडीने स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 
 
गोदाकाठ परिसरातील सुरक्षारक्षक गायब 
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोदाकाठ परिसरात ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीने सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी नियुक्त सुरक्षारक्षक अनेकदा गायबच राहत असल्याने या प्रकाराकडेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहेत. 

 
बातम्या आणखी आहेत...