आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेशोत्सवात वीजचोरी रोखणार दामिनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- हरातगणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडून होणारी वीजचोरी रोखण्यासाठी ‘महावितरण’च्या वतीने दामिनी पथक तयार करण्यात आले असून, महिलांचे हे पथक वीजचोरीवर लक्ष ठेवणार आहे. तसेच, संपूर्ण शहरावर लक्ष ठेवणे दामिनी पथकाला शक्य नसल्याने ‘महावितरण’ने विभागनिहाय पथकाची स्थापना केली आहे. नाशिक शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लहान-मोठ्या पाचशेपेक्षा अधिक मंडळांची नोंदणी असून, सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.

गणेशोत्सवात मंडळांसाठी सामान्य ग्राहकांपेक्षा कमी वीजदर आकारला जात असताना, विद्युत रोषणाईसाठी तसेच आकर्षक देखावे सादर करण्यासाठी काही मंडळांकडून वीजचोरी केली जाते. त्यामुळे अपघातांची शक्यता असते. अनधिकृत पुरवठा चोरी रोखण्यासाठी महिलांचा सहभाग असलेल्या दामिनी पथकाची करडी नजर असणार आहे. पथक प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी जाऊन वीज कनेक्शनची तपासणी करून अधिकृत वीजपुरवठ्याचे आवाहन करणार आहे. दामिनी पथकात महिला अभियंत्यासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. पथक चोरीच्या तपासणीसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन चोरीचे दुष्यपरिणामांबाबत अवगत करणार आहे.

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या लक्षात घेऊन ‘महावितरण’ने दामिनी पथकाच्या मदतीला वीजचोरी रोखण्यासाठी विभागनिहाय पथकाची निर्मिती केली आहे. दामिनी पथकाप्रमाणेच अतिरिक्त पथक शहरात मंडळाच्या पुरवठ्याची तपासणी करून त्यांना मंडळांसाठी दहा दिवसांसाठी मीटर देण्यात येत असल्याची माहिती देणार आहे.

महावितरणतर्फे शहरात विभागनिहाय महिलांच्या अतिरिक्त पथकाची स्थापना दक्षता पथक करणार मंडळांचे प्रबोधन गणेशोत्सवातशेकडो युनिट विजेची चोरी होत असल्याने दामिनी अतिरिक्त पथकाकडून मंडळाचे प्रबोधन करून त्यांना मंडळासाठी कमी दर दहा दिवसांसाठी मीटर देण्याची योजना असल्याची माहिती देऊन अधिकृत पुरवठ्याचे आवाहन करणार आहे. आर.डी. चव्हाण, कार्यकारी अभियंता, वीज महावितरण कंपनी