आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये इटालियन बनावटीच्या पिस्तुलासह शस्त्रे जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भद्रकाली परिसरातील मोठा राजवाडा भागातील एका घरावर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी टाकलेल्या छाप्यात इटालियन बनावटीच्या पिस्तुलासह अनेक शस्त्रे हस्तगत करण्यात आली. अवैधरीत्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी एकास अटक केली असून दुसर्‍या संशयिताचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वाजेच्या सुमारास आसिम अमीन कादरी याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी आसिमचा भाऊ फईम अमीन कादरी घऱात होता. पोलिसांनी फईमची चौकशी करून घराची झडती घेतली असता सुमारे 50 हजार रुपये किंमतीच्या इटालियन बनावटीच्या पिस्तुलासह तलवार, चॉपर, कोयता आणि खिळे लावलेले लाकडी साहित्य अशी सुमारे चार हजारांची शस्त्र सापडली. फईम कादरीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आसिफचा शोध सुरू आहे. पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील, सहाय्यक आयुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.