आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय शब्द तरी ओठातून बोलावा, नेत्री नयना टाकून गेली ओलावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकीकडे तिची भिरभिरती नजर, तर दुसरीकडे इतरांच्या डोळ्यांच्या ओल्या कडा.. असे दृश्य बुधवारी आधाराश्रमात अनुभवायला मिळाले. येथील नयना जणू आपल्या पालकांचीच वाट बघत होती, अशा उत्सुकतेने आणि आनंदाने ती इटलीच्या नव्या आई-बाबांच्या कुशीत विसावली. जन्मत:च सिकलसेल आजाराने ग्रासलेल्या नयनाला बुधवारी हक्काचे घर-कुटुंब मिळाले.

शहरातील आधाराश्रमातील चार वर्षांच्या नयनाला इटलीतील डी स्टॅफेनो लुका बेलो डोनेलटिला या दांपत्याने आपलेसे केले. नयना दत्तक घेण्यासाठी या दांपत्याला गेल्या नऊ महिन्यांपासून तीव्र ओढ लागली होती. अखेर कायदेशीर कामकाज पूर्ण झाले आणि मोठ्या आनंदाने नयना इटलीला रवाना झाली. तिथल्या सरकारकडून नयनावर पूर्णत: मोफत उपचार केले जातील. तिचे आयुष्य नक्कीच बदलून जाईल. गेल्या दोन वर्षांपासून आधार आश्रमातील एकूण चार बाळे परदेशात रवाना झाली आहेत.

आणखीचार बाळांची प्रक्रिया
आतापर्यंतएकूण चार बाळे परदेशात रवाना झाली आहेत. अाणखी चार बाळांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. सरकारी कामकाजानंतर आणखी चार जणांना त्यांचे हक्काचे कुटुंब मिळणार आहे.

आमच्या चिमुकल्या नयनाला गेल्या काही वर्षांपासून सिकलसेल हा गंभीर आजार होता. त्यामुळे तिने आमच्याकडून भरपूर धावपळ करवून घेतली. परंतु, अखेर तिला चांगले आणि उत्तम कुटूंब मिळाल्याचा मला खूप मनापासून आनंद झाला आहे. या दांपत्याच्या रूपात आमच्या कष्टाचे फळ आम्हाला मिळाले. तिला नव्या कुटुंबात मोठा आधार मिळाल्याचेही समाधान आहे. डॉ.अनुराधा दशपुत्रे

नयनासाठी विशेष धावपळ
आधाराश्रमातीलसगळ्याच मुलांसाठी विशेष धावपळ करण्यात येतेच. परंतु, नयनाच्या सिकलसेल आजारामुळे तिच्यावर विशेष लक्ष केंद्रित झाले होते. गेल्या चार वर्षांपासून जास्तीत जास्त वेळा तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. अगदी पाळण्यात होती तेव्हापासून नयना आमच्याकडे होती. त्यामुळे प्रत्येकाला तिचा लळा लागला होता. तिच्या जाण्याने जितका आनंद होत आहे, तेवढेच दु:खदेखील होत आहे. कधी कधी तर अगदी पावसा-पाण्यातदेखील तिला डॉक्टरकडे नेण्याची वारंवार गरज पडायची. परंतु, तिच्यासाठी कोणीही त्या बाबतीत कधीही टाळाटाळ केली नाही. राहुलजाधव, अॅडाॅप्शन कोऑर्डिनेटर
पुढे पाहा काही क्षणचित्रे...