आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल करता केवळ तक्रार अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अायटीअायच्या अांतरवासीयता (अप्रेंटिसशिप) परीक्षेचा फिटर ट्रेडचा पेपरफुटी प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याचे अादेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी दिले असले तरीही नाशिकमध्ये पेपर फुटलाच नसल्याचा दावा करीत सातपूर अायटीअायच्या व्यवस्थापनाने पाेलिस स्टेशनमध्ये पेपरफुटीबाबत केवळ तक्रार अर्ज दिला अाहे.

पेपर काेणी फाेडला याचा तपास पाेलिसच करतील, असा दावा करणारे शिक्षण विभागाचे सहसंचालक एकीकडे अाणि गुन्हा अामच्या हद्दीत घडलाच नाही, असे सांगून केवळ तक्रार अर्ज देणारी सरकारी व्यवस्था दुसरीकडे, अशा दाेन टाेकाच्या भूमिका घेतल्या जात असल्याने या गुन्ह्याचा अाणि गुन्हेगारांचा तपासच लागू नये, अशीच व्यवस्था निर्माण करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत अाहे.

अायटीअायचा दाेन वर्षांचा काेर्स पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष शिकाऊ उमेदवारी केली जाते. या काळात अप्रेंटिसशिपची परीक्षा घेतली जाते. संपूर्ण भारतभर ही परीक्षा घेतली जाते. यंदाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी १३ अाॅक्टाेबर राेजी हाेणाऱ्या फिटर ट्रेडच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये सुरू हाेती. शंभर गुणांची हिंदी अाणि इंग्रजी भाषेतील ही प्रश्नपत्रिका अाश्चर्यकारकरित्या व्हाॅट्सअॅपवर व्हायरलदेखील झाली हाेती. ‘दिव्य मराठी’च्याही हातात ही प्रश्नपत्रिका पडल्याने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात अाले हाेते.
या वृत्ताविषयीची माहिती शिक्षण सहसंचालक पी. एम. वाकडे यांना सामाजिक कार्यकर्ते प्रसाद देशमुख त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिली हाेती. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका रद्द करून दुसरी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडणे अपेक्षित हाेते. प्रत्यक्षात मात्र फुटलेलीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडली. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने शिक्षण संचालक ज. द. भुतांगे यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणाची चाैकशी करण्याचे अापण अादेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे नाशिकमध्ये गुन्हे दाखल करण्याचेही त्यांनी शिक्षण उपसंचालक पी. एम. वाकडे यांना अादेशित केले. वाकडे यांच्याशी संपर्क साधला असता सातपूर अायटीअायच्या प्राचार्यांना गुन्हा दाखल करण्याचे अादेशित केले असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्यक्षात सातपूरच्या प्राचार्यांनी गुन्हा दाखल करण्याएेवजी केवळ तक्रार अर्जच दिला अाहे.

ही परीक्षा भारतभर घेण्यात अाल्याने अाणि पेपर फाेडणारा नाशिकचा नसल्याचे निष्पन्न झाल्याने सातपूर अायटीअायच्या उपप्राचार्यांनी नाशिकमध्ये गुन्हा दाखल करता केवळ तक्रार अर्ज देण्याची भूमिका घेतल्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मनाेज करंजे यांनी दिली.

एकीकडे संपूर्ण प्रकरणाचा तपास केवळ पाेलिसच करू शकतात, असे सहसंचालकांकडून सांगितले जात असताना दुसरीकडे तपासासाठी अावश्यक असणारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाच केली जात नसल्याने शासनाच्या व्यवस्थेविषयीच संशय व्यक्त केला जात अाहे. दरम्यान, पेपरफुटीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अायटीअायचे प्राचार्य एस. डी. नलावडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माेबाइल कट केला.

उपप्राचार्यांचा जबाब नाेंदविला
^सातपूर अायटीअायने केवळ तक्रार अर्ज दाखल केला अाहे. यासंदर्भात शहरात किती पेपर येतात, ते काेठे ठेवले जातात, याविषयी अायटीअायने शहानिशा केली अाहे. पेपर नाशिकमध्ये फुटल्याचे त्यांच्या निदर्शनास अाल्याने त्यांनी केवळ तक्रार अर्ज दाखल केला अाहे. यासंदर्भात उपप्राचार्यांचा जबाब नाेंदवण्यात अाला अाहे. मनाेज करंजे, पाेलिस निरीक्षक, सातपूर
बातम्या आणखी आहेत...