आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jabbar Patel News In Marathi, Kusumagraj Pratishthan, Nashik, Divya Marathi

माणूसपण जपल्याशिवाय कलाकार मोठा होत नाही, जब्बार पटेल यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘कुठल्याही क्षेत्रात अव्वल कार्य करण्याबरोबर माणूसपणाची जोड असल्याशिवाय मोठेपणा लाभत नाही. समाजाप्रति असलेल्या कर्तव्याचं भान कला, समाजसेवा, शिक्षण आदींच्या माध्यमातून डोळसपणे जपता आले पाहिजे,’ असे प्रतिपादन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी कालिदास कलामंदिर येथे कुसुमाग्रज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गोदावरी गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी केले. अत्यंत भावपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

डॉ. पटेल पुढे म्हणाले, ‘गरिबांच्या व्यथेला वाचा फोडणारे डॉ. अनिल अवचट, संगीतात व्हायोलिनवादनात अभूतपूर्व क्रांती करणार्‍या एन.राजम, अभिनेते डॉ. मोहन आगाशे, गिर्यारोहक नेहा पावसकर, शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे या दिग्गजांचा गौरव म्हणजे समाजाप्रति माणूस म्हणून कर्तव्य निभावणार्‍या मानवतेचा पुरस्कार करणार्‍या विचारांचा गौरव आहे,’ असे सांगत डॉ. पटेल यांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचा आढावा घेत कुसुमाग्रजांच्या स्मृतींनाही उजाळा देण्यात आला.
सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कथक नृत्यांगना सुमुखी अथणी यांनी कुसुमाग्रजांच्या ‘अनंततेचे गहन सरोवर’ या कवितेवर कथक नृत्य सादर केले. या वेळी व्यासपीठावर विश्वास बॅँकेचे संस्थापक विश्वास ठाकूर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे, सहकार्यवाह विनायक जोशी उपस्थित होते. कार्यक्रमास महापौर यतिन वाघ हेदेखील सभागृहात उपस्थित होते.

गौरव मान्यवरांचा
अंध असूनही त्यावर मात करीत हिमालयातील झोंगरीसारखे उंच शिखर पार करणार्‍या नेहा पावसकर, शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट, ज्येष्ठ हिंदुस्थानी व कर्नाटकी संगीत व्हायोलिन वादक एन. राजम यांना डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते अनुक्रमे साहस, ज्ञान, नाट्य, चित्र, लोकसेवा, संगीत या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गोदावरी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गौरव सोहळ्याचे निवेदन किशोर पाठक यांनी केले.
‘कुठल्याही क्षेत्रात अव्वल कार्य करण्याबरोबर माणूसपणाची जोड असल्याशिवाय मोठेपणा लाभत नाही. समाजाप्रति असलेल्या कर्तव्याचं भान कला, समाजसेवा, शिक्षण आदींच्या माध्यमातून डोळसपणे जपता आले पाहिजे,’ असे प्रतिपादन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी कालिदास कलामंदिर येथे कुसुमाग्रज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गोदावरी गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी केले. अत्यंत भावपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

डॉ. पटेल पुढे म्हणाले, ‘गरिबांच्या व्यथेला वाचा फोडणारे डॉ. अनिल अवचट, संगीतात व्हायोलिनवादनात अभूतपूर्व क्रांती करणार्‍या एन.राजम, अभिनेते डॉ. मोहन आगाशे, गिर्यारोहक नेहा पावसकर, शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे या दिग्गजांचा गौरव म्हणजे समाजाप्रति माणूस म्हणून कर्तव्य निभावणार्‍या मानवतेचा पुरस्कार करणार्‍या विचारांचा गौरव आहे,’ असे सांगत डॉ. पटेल यांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचा आढावा घेत कुसुमाग्रजांच्या स्मृतींनाही उजाळा देण्यात आला.
सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कथक नृत्यांगना सुमुखी अथणी यांनी कुसुमाग्रजांच्या ‘अनंततेचे गहन सरोवर’ या कवितेवर कथक नृत्य सादर केले. या वेळी व्यासपीठावर विश्वास बॅँकेचे संस्थापक विश्वास ठाकूर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे, सहकार्यवाह विनायक जोशी उपस्थित होते. कार्यक्रमास महापौर यतिन वाघ हेदेखील सभागृहात उपस्थित होते.

गौरव मान्यवरांचा
अंध असूनही त्यावर मात करीत हिमालयातील झोंगरीसारखे उंच शिखर पार करणार्‍या नेहा पावसकर, शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट, ज्येष्ठ हिंदुस्थानी व कर्नाटकी संगीत व्हायोलिन वादक एन. राजम यांना डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते अनुक्रमे साहस, ज्ञान, नाट्य, चित्र, लोकसेवा, संगीत या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गोदावरी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गौरव सोहळ्याचे निवेदन किशोर पाठक यांनी केले.