आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणात येणार पाइपलाइनमधून पाणी, गिरीश महाजन यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक- अहमदनगरमधून जायकवाडीस सोडलेल्या पाण्याचा वहनमार्गात बराच अपव्यय झाला. इतरही ठिकाणी आवश्यक पाण्यापेक्षा चार ते पाचपट पाणी वायाच जाते.भविष्यात हे पाणी वाचविण्यासाठी नाशिक-नगरच्या धरणातून जायकवाडीला तसेच राज्यात शक्य त्या ठिकाणी थेट पाइपलाइनद्वारेच पाणी देण्याचा विचार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यंदा राज्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे उपलब्ध पाण्याचेच काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी थेंबन् थेंबाचे नियोजन आणि हिशेब ठेवला जाईल. नदी, कालवे आणि पाटाने सोडलेल्या पाण्याच्या वहनमार्गात होणारा अनधिकृत उपसा, चोरी यामुळे चार-पाचपट अधिक अपव्यय होतो. तो कमी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी सर्वच प्रकल्पांचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. सिंचनालाही पाणी देताना त्याचा कमी अपव्यय व्हावा म्हणून उसासारख्या पिकांनाही ड्रीपनेच पाणी देण्याचा आग्रह धरणार असून त्याशिवाय सिंचनाला पाणीच देणार नसल्याचीही कठोर भूमिका सरकार घेणार असल्याचेही महाजन म्हणाले.
७९ ठिकाणी पाईपलाईन टाकण्याची शक्यता -
राज्यात एक प्रकल्पातून दूसऱ्या प्रकल्पात पिण्यासह इतर कारणांसाठी नदी, कालवे किंवा पाटानेच पाणी दिले जाते. नाशिक-नगरमधूनही नदीमार्गानेच १३ टीएमसी पाणी सोडल्यानंतर जायकवाडीला टीएमसीच पाणी पोहचले. हीच स्थिती उजनीतून सोलापुरला सोडलेल्या पाण्याचीही आहे. दोन टीएमसी पाणी सोडण्यासाठी १० टीएमसी पाणी सोडण्याची मागणीस उच्च न्यायालयानेच स्थगिती दिली. पण भविष्यात पाणी द्यावेच लागणार असल्याने अपव्यय टाळण्यासाठी पाईपलाईनचा विचार सुरु असून, राज्यातील ७९ मार्गावर ती टाकावी लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...