Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Jail Raod On Deirty Water

जेलरोडला वाहताहेत सांडपाण्याचे लोट

प्रतिनिधी | May 14, 2012, 11:49 AM IST

  • जेलरोडला वाहताहेत सांडपाण्याचे लोट

नाशिकरोड: प्रभाग 35 मध्ये जेलरोडवरील बिशप हाऊससमोर ड्रेनेज लाइनचे चेंबर तुंबले आहे. त्यामुळे तेथील सांडपाणी सुमारे अर्धा किलोमीटर वाहत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नाकाला रुमाल लावूनच नागरिकांना वर्दळीच्या या मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.
गेल्या चार दिवसांत दुसर्‍यांदा असा प्रकार झाला आहे. जेलरोडवर याआधी तीन चेंबर तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. दोन दिवसांनी त्यातील दोन चेंबर दुरूस्त झाले. त्यानंतर रविवारी सकाळी दुरुस्त न झालेले चेंबर पुन्हा तुंबले आणि सांडपाण्याचा पाट थेट जेलरोडवरूनच वाहू लागला. त्यामुळे या रस्त्यावर भाजीविक्रीचा व्यवसाय करणार्‍यांना सुट्टी घ्यावी लागली. अनेकांनी फूटपाथ किंवा मोकळ्या जागेत बसून व्यवसाय केला.
अवकाळी पावसामुळे या चेंबरच्या समोरच्या बाजूला असलेल्या र्शी महालक्ष्मी मंदिरासमोर पाण्याचे तळे तयार झाले होते. ते अजूनही तसेच आहे. चेंबरमधून सांडपाणी वाहू लागल्याने त्यात आणखी भर पडली आहे. या ड्रेनेजची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Next Article

Recommended