आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक: जेलरोडवासीयांना तब्बल पाच तास अंधाराची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- शहरातील सर्वाधिक लोकसंख्येच्या जेलरोड विभागाचा विद्युत पुरवठा बुधवारी जवळपास पाच तास खंडित राहिल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

जुना सायखेडा रोडवरील होली फ्लॉवर शाळेजवळील 11 केव्ही वाहिनीवरील कंडक्टर व नारायणबापूनगर चौकात वाहिनीवरील जंप तुटल्यामुळे पुरवठा खंडित झाल्याचे

महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. वाहिन्या जोडणारा कंडक्टर दोन्ही बाजूने तुटण्याची अलीकडच्या काळातील पहिलीच घटना असून, पावसामुळे ती घडली असावी. दुपारी 3 वाजेच्या सुमारास पावसास सुरुवात होताच पुरवठा खंडित झाला. तत्पूर्वी किमान दोन तास कमी दाबाने पुरवठा सुरू असल्याने विद्युत उपकरणे जळू

मोठा बिघाड
कंडक्टर तुटून जंपचा मोठा बिघाड झाला. दहा कर्मचार्‍यांनी पाऊस, अंधारात पर्शिम घेऊन तो दुरुस्त केला. असा बिघाड यापूर्वी झाला नव्हता. तो होण्याचे कारण समजू शकले नाही.
-दीपक चौधरी, कनिष्ठ अभियंता