आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहेच्छुकांसाठी जैन संघटनेचे कार्य कौतुकास्पद; महाराष्ट्र अध्यक्ष अमर गांधी यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जैन समाजात शिक्षित विवाहेच्छुक युवक-युवतींचे प्रमाण वाढत असून, त्यांना अनुरूप जोडीदार मिळावा यासाठी भारतीय जैन संघटना मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. यातील अनेक विवाह हे संमेलनानंतर काही महिन्यांतच जुळत असल्याचे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अमर गांधी यांनी केले. भारतीय जैन संघटना, नाशिकच्या वतीने शनिवारी (दि. ३०) गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात शिक्षित-उच्चशिक्षित जैन विवाहेच्छुक युवक-युवतींचे परिचय संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रातील विविध भागांतून १३० मुले, तर ७५ मुलींनी सहभाग नोंदविला. 
 
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अशोक बागमार, अजय ब्रह्मेचा, मोहन बागमार, सुनील चोपडा, ललित मोदी, रवींद्र पारख, नितीन राका, सचिन गांग, पंकज पटनी, सुभाष छोरिया आदी उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक नंदकिशोर साखला यांनी परिचय संमेलन भरविण्यामागील हेतू स्पष्ट केला. संमेलनात आजच विवाह जमविण्याची घाई करता एकमेकांच्या घरी जाऊन विवाह जमवावेत, असे आवाहन त्यांनी केले.  प्रारंभी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रभा सुराणा जयश्री लुणिया यांनी नवकार महामंत्र सादर केला. प्रास्ताविक यतिश डुंगरवाल यांनी केले. संतोष कोटेचा यांनी आभार मानले. सूत्रसंचलन प्रफुल्ल पारख यांनी केले. 
कार्यक्रम यशस्वितेसाठी भारतीय जैन संघटना, नाशिक शाखेचे सतीश बोरा, गोटू चोरडिया, परेश बागरेचा, विजय डोशी, दिलीप पहाडे, सुनील ललवाणी, मनोज मंडलेचा, महेंद्र राका, संजय चोपडा, सुरेश सुराणा, सुमित मंडलेचा, रोशन टाटिया, संगीता संचेती, उन्नती भटेवरा, स्नेहल छोरिया, अनिता साखला, ललित सुराणा, संतोष दुगड, हर्षल धाडीवाल, नीलेश सुराणा, संतोष संकलेचा, गौतम हिरण, दिलीप दुगड आदी प्रयत्नशील होते. 
बातम्या आणखी आहेत...