आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाैरपदाच्या इच्छुकांची जलपूजनासाठी मांदियाळी, गंगापूर धरणावर रंगला कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूर धरण ९१ टक्के भरल्याचे निमित्त साधून सालाबादप्रमाणे जलपूजनाचा विधिवत सोहळा यंदाही दिमाखात पार पडला. दरम्यान, महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी या वेळी जमली. महापौरांच्या रांगेत बसून इच्छुकांनी शर्यतीत आपण कसे उजवे हे दाखवून दिले.

शनिवारी सकाळी ११ वाजता महापौर अॅड. यतिन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी महापौरपदाच्या शर्यतीत असलेले अनेक इच्छुक जातीने हजर होती. त्याबरोबरच विधानसभा निवडणूक रिंगणात दंड थोपटणाऱ्या नगरसेवकांची उपस्थिती लाभली. महापौरांच्या हस्ते पूजा सुरू असताना इच्छुकांनी त्यांच्या शेजारील रांगेत बसकन मारली. त्यानंतर इच्छुकांमध्ये नारळ अर्पण करण्याची स्पर्धा लागली होती. या वेळी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, सभागृहनेते शशिकांत जाधव, अपक्ष आघाडीचे गटनेते गुरमित बग्गा, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादी गटनेता कविता कर्डक, देवयानी फरांदे, यशवंत निकुळे, सतीश सोनवणे, दामोधर मानकर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी-अधिकारी उपस्थित होते.