आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचा धुमाकूळ घालण्याचे सत्र सुरूच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, द्वारका परिसरात कैलास सीताराम खैरनार यांच्या जयजलाराम सोसायटीतील घर फोडून चोरट्यांनी 57 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. खैरनार शुक्रवारी बाहेरगावी असल्यामुळे त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी त्याचा फायदा उचलत कपाट तोडून ऐवज लांबवला.
दुसरी घटना रविवार कारंजावरील फावडे लेनजवळ घडली असून, जळगावमधील कोळगावात राहणा-या कविता सुधीर महाजन यांची 34 हजार 600 रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी पळवली. कटलरी दुकानाजवळ महाजन खरेदी करीत असताना चोरट्यांनी बॅँगमध्ये ठेवलेली त्यांची दीड तोळे सोन्याची पोत लांबवली.
45 हजाराची घरफोडी
कामटवाडे येथील अनिरुद्ध प्लाझामध्ये राहणारे किरण साहेबराव आढाव यांच्या घरातून गुरुवारी 45 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
सोनसाखळी लांबवली
वडाळा-पाथर्डीरोडवर राहणा-या कांचनमाला सिद्धेश स्वामी यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीची सोनसाखळी राजसारथी रस्त्यावरून अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी लांबवली. स्कुटीवरून जात असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून मोटारसायकलवरून पलायन केले.
मोबाइल, बॅगची चोरी
रविवार कारंजावर पायनपल ज्यूस सेंटरजवळून शुक्रवारी चोरट्यांनी अनिता अशोक शिरसाठ यांची 16 हजार 800 रुपये रोख रक्कम व मोबाइल असलेली बॅँग पळवून नेली. यासंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
युवकास बेदम मारहाण
इंदिरानगर येथील वासू-स्वप्नपूर्ती कला व क्रीडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानासमोर केतन सुरेश काळे व सागर सुदाम नाडे (रा. वडाळानाका) मद्याच्या नशेत मुलांना मारहाण करीत असल्याने त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणा-या नितीन प्रभाकर अमृतकर (रा. इंदिरानगर) यांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे.