आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalsampada Department False Report News In Divya Marathi

जलसंपदा विभागाचा चुकीचा अहवाल बदला, अाैद्याेगिक विकासाला अहवालामुळे खोडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिन्नर-नाशिक-इगतपुरीयेथे पुढील टप्प्यात अाैद्याेगिक क्षेत्र विकसित करण्याची तयारी सध्या सरकारकडून केली जात असली, तरी नाशिकच्या अाैद्याेगिक विकासाला अातापर्यंत मारक ठरलेल्या जलसंपदा विभागाचा पाणी उपलब्ध नसल्याचा अहवाल तातडीने बदलणे गरजेचे असल्याची मागणी जाेर धरू लागली अाहे. नाशिकचे पालकमंत्री िगरीश महाजन यांच्याकडेच जलसंपदा विभाग असल्याने त्यांनी गत सरकारच्या काळातील हा खाेटा अहवाल बदलणे गरजेेचे असल्याची मागणी हाेत अाहे. एकंदरीतच मराठवाड्याला िदलेले पाणी, त्यानंतर विदर्भ-मराठवाड्यातील उद्याेगांना स्वस्त दरात विजेच्या सरकारच्या पवित्र्याने असंताेषाचा पेटलेला वणवा अाैद्याेगिक जगतात धगधगतच राहणार, अशी िचन्हे अाहेत.

जिल्ह्यात लहान-माेठी २३ धरणे असून, त्यातून मुंबई, मराठवाड्यालाही नाशिकमधून पाण्याचा पुरवठा हाेत असताे. असे असतानाही िदल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाेरमध्ये मुबलक पाणी उपलब्ध नसल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने िदल्याने नाशिक परिसराचा समावेश हाेऊ शकला नसल्याची माहिती गतवर्षी 'एमअायडीसी'चे विशेष कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांनी नाशिकमध्ये उद्याेजकांना संबाेधित करताना िदली हाेती. पाण्यामुळेच शेंद्रा-बिडकीनचा समावेश या काॅरिडाेरमध्ये केला गेल्याचेही त्यांनी यावेळी जाहीरपणे सांगितले हाेते. विशेष म्हणजे, शेंद्रा-बिडकीनला नाशिकहून पाणी जाते हे वास्तव असतानाही असा खाेटा अहवाल का िदला गेला, याबाबत अाजही एकाही लाेकप्रतिनिधीने विचारणा सरकारकडे केलेली नाही िकंवा नाशिकच्या अाैद्याेगिक विकासाला खाेडा ठरणारा हा अहवाल बदलण्याची मागणीही केलेली नाही हेही विशेष .

कारवाई करावी
^जलसंपदाविभागानेनाशिकमध्ये पाणी उपलब्ध नसल्याचा िदलेला अहवाल तातडीने रद्द करून असा अहवाल देणाऱ्यांवर कठाेर कारवाई झाली पाहिजे. या अहवालामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासात अडथळा निर्माण झाला आहे.
- ज्ञानेश्वर गाेपाळे, उपाध्यक्ष,निमा

विकास राेखला
^जलसंपदाच्यायाअहवालाने नाशिकचा अाैद्याेगिक विकास राेखला अाहे. त्यामुळे सरकारने जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अाणि पालकमंत्र्यांनी तत्काळ हा अहवाल रद्द करावा यासाठी अाम्ही मागणी करणार अाहाेत.
-राजेंद्र अहिरे, सरचिटणीस, अायमा

'मेक इन इंडिया'त नाशिक गायब
'मेकइन इंडिया'त नाशिकला सादर करण्यात अाले नाही. विदर्भ-मराठवाडा अाणि चाकणचाच बाेलबाला िदसून अाला. सरकारकडूनही धावत्या स्वरूपाचा अाणि बंद हाॅलमध्ये एक 'राेड शाे' केला गेला, त्याव्यतिरिक्त नाशिकमध्ये िकंवा नाशिकला 'मेक इन इंडिया'त सादर केले नसल्याची खंत या उपक्रमाला भेट िदलेल्या नाशिकच्या बहुतांश उद्याेजकांनी बाेलून दाखविली.