आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जनलक्ष्मी’ची बैठक निष्फळ; सहा दिवसांपासून कामबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जनलक्ष्मी बॅँकेतील कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा तिढा सहाव्या दिवशीही कायम राहिला. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी विभागीय सहनिबंधक कार्यालयात शनिवारी दुपारी बैठक बोलावलेली आलेली बैठक तोडगा निघू न शकल्याने निष्फळ ठरली. दरम्यान, कामबंद आंदोलनाला आठवडा पूर्ण झाल्याने व मागील आंदोलन 33 दिवस चालल्यामुळे सभासद आणि ठेवीदारांत चिंतेचे वातावरण आहे.

कर्मचारी प्रतिनिधी व संचालक मंडळ प्रतिनिधींची बोलावलेली संयुक्त बैठक विभागीय सहनिबंधक कुठलाही तोडगा न निघता दहा मिनिटांत पार पडली. बैठकीच्या सुरुवातीलाच बॅँकेचे अध्यक्ष माधवराव पाटील यांनी आपल्याला शंभर कर्मचारी कमी करायचे असल्याची भूमिका मांडल्याने बैठकीत तथ्यच नसल्याने चर्चा होऊ न शकल्याचा आरोप को- ऑप. बॅँक्स एम्प्लॉइज युनियनचे सरचिटणीस अँड. विलास आंधळे यांनी केला, तर कर्मचार्‍यांच्या मागण्या अवाजवी असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. बॅँकेच्या सद्यस्थितीचा अहवाल सहकार आयुक्तांना पाठविणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांनी स्पष्ट केले.