आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खातेदारांच्या दबावामुळे ‘जनलक्ष्मी’ तिढा सुटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जनलक्ष्मी सहकारी बँकेतील कर्मचार्‍यांनी पुकारलेले बेमुदत बंद आंदोलन शुक्रवारी मागे घेतले. व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेत खातेदारांनी जनलक्ष्मी बँकेत जाऊन बँकिंग सुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याने निर्माण झालेल्या दबावामुळे हा तिढा मिटला. शनिवारी (दि. 28) लॉकर्स सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, सोमवारपासून सर्व बँकिंग सुविधा सुरू होणार आहेत.

आंदोलनाचा हा तिढा सोडवण्यासाठी शुक्रवारी दिवसभर बैठक झाली. को-ऑप. बँक्स एम्प्लॉइज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी अँड. विलास आंधळे, बँकेचे अध्यक्ष माधवराव पाटील, जनसंपर्क संचालक जयंत जानी, मधुकर हिंगमिरे, मुकुंद पवार, अशोक जाधव, अतुल गिरी, प्रशासन अधिकारी कैलास माळोदे यांनी सहभाग घेतला. निलंबित कर्मचारी सुनील साठे यांची पुनर्नियुक्ती, शंभर कर्मचार्‍यांच्या ‘रिट्रेचमेंट’ (कामावरून कमी) नोटीस मागे घेत त्यांना तीन महिने अध्र्या पगारावर काम, स्वेच्छानिवृत्ती रक्कम निश्चित करून तशी सुविधा व स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास उर्वरित 50 टक्के पगार तीन महिन्यांनंतर असा करार करण्यात आला. संप काळातील वेतन कर्मचार्‍यांना मिळणार नाही.